Agricultural Damage: अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टरवर पिकांना फटका
Heavy Rain Update: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडलांमधील १४ लाख ३६ हजार २३६ हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत.