Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : विदर्भातील बाजारांत तुरीच्या दरात सुधारणा

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कळमना बाजार समितीत तुरीची नियमित आवक होत आहे. मात्र गेल्या पंधरवाड्यापासून तुरीचे दर दबावात असताना आता त्यात काहीशी सुधारणा अनुभवली जात आहे. १०,००० ते १०,८०० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी तुरीने १२ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर तुरीच्या दरात प्रतिक्‍विंटल ३०० ते ४०० रुपयांची घट नोंदविण्यात आली. सध्या तुरीची आवक १९१ क्‍विंटल असून तुरीला १०,००० ते १०,८०० रुपयांचा दर मिळत आहे. अवघ्या एक दिवस आधी १०,५०० ते ११,००० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत होते.

विदर्भातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कळमना बाजारात तुरीला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल अधिकचा दर मिळत होता. आताही अमरावती वगळता इतर बाजारांच्या तुलनेत या ठिकाणी तुरीला चांगला दर मिळत आहे. शेगाव (बुलडाणा) बाजाराचा विचार करता या ठिकाणी जेमतेम वीस क्‍विंटल तूर आवक होत आहे.

या ठिकाणी तूर अधिकच दबावात असून ९,००० ते १०,२४० रुपयांनी व्यवहार होत आहेत. चांदूरबाजार (अमरावती) या बाजार समितीत तूर ९,००० ते १०,८०० रुपयांवर होती. २३ जुलै रोजी या बाजारातील तुरीचा दर ९,००० ते ११,१०० रुपयांवर होता. चार दिवसांतच दरात मोठी घट नोंदविण्यात आली. यवतमाळ बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी १०,२०० ते १०,९०० रुपयांनी तुरीचे व्यवहार होत होते.

येत्या काही दिवसांत यवतमाळ बाजारात तूर ११ हजार रुपयांचा पल्ला गाठेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. अकोला जिल्ह्यात तुरीखालील क्षेत्र मोठे राहते. सोयाबीन व त्यात तुरीचे आंतरपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील बाजार समितीत ४०३ क्‍विंटल आवक होत असून किमान ८,००० तर कमाल ११,१५० रुपयांचा दर मिळत आहे.

या ठिकाणी तुरीचा सरासरी दर १० हजार रुपयांवर आहे. विशेष म्हणजे अकोला हे तूर प्रक्रिया उद्योगाचे हब मानले जाते. या ठिकाणी तुरीवर प्रक्रिया करणारे सर्वाधिक उद्योग आहेत. देशाच्या विविध भागांत येथील तूरडाळ पाठविली जाते. गेल्या हंगामातील तुरीला चांगला दर असल्याने यंदा देखील तुरीखालील क्षेत्र वाढीस लागले आहे.

दरामुळे अमरावतीत वाढली तुरीची आवक

तुरीचे दर दबावात आल्यानंतर अमरावती बाजार समितीमधील तुरीची आवक मंदावली होती. आता दरात सुधारणा होत असल्याने बाजारातील आवक देखील वाढीस लागली आहे. बाजारात नवी तूर येण्यास बराच कालावधी शिल्लक आहे. मात्र दरवाढीच्या अपेक्षने शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केली होती. आता दर १०,५०० ते १०,९५१ रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर विक्रीसाठी आणली आहे. त्यामुळे बाजारात तूर आवक १०९८ पोत्यांवर पोहोचली आहे. नागपूरच्या कळमना बाजाराच्या तुलनेत या ठिकाणी दर दबावात असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT