Market Update  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कांदा दरात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत तीळ दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तीळ आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आठवड्याच्या शेवटी सुधारणा दिसून आली. तर सोयापेंड काहिसे नरमले. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १०.३० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात काहिशी सुधारणा

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे शुक्रवारी ७०.९८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत. जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५६ हजार ९०० रुपयाने व्यवहार झाले. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांदा दरात सुधारणा

राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. सध्या कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर खरिप कांद्याची बाजारातील आवक काहिशी लांबली आहे. त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे. खरिपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील. परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.  

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT