Ginger Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आले पिकाच्या दरात सुधारणा

विकास जाधव 

Satara News : जिल्ह्यातील खोडवा आले पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर मे, जून मध्ये नवीन लागवड केलेले आले काही शेतकऱ्यांकडून काढणीस सुरुवात केली आहे. या आल्यास पिकास प्रतिगाडी (५०० किलो) २० ते २२ हजार रुपये दर मिळत आहे. आल्याच्या दरात प्रतिगाडी तीन ते चार हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात दररोज पाऊस सुरू असल्याने पिके काढणीवर परिणाम होत आहे. सततच्या पावसामुळे आले पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिणामी आल्यात मूळकुज, कंदकुजमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित होत आहे. एकूण लागवडीच्या ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर पिकांवरील मूळकुजीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मागील चार वर्षांत आल्यास समाधानकारक दर असल्याने आले पीक टिकवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चात भसमसाट वाढ होत आहे. यामुळे पीक हाताला लागेल न लागेल या भीतीने काही शेतकऱ्यांकडून आले काढणी करण्याकडे कल वाढला आहे. या आल्यास मागील १५ दिवसांत प्रतिगाडी १७ ते १८ हजार दर मिळत होता. या दरात सुधारणा झाली असून प्रतिगाडीस २० ते २२ हजार रुपये दर मिळत आहे.

गाडीमागे तीन ते चार हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे आले काढणीही शक्य होत नाही. मजूर काढणीस उपलब्ध होत नसल्याने आले मार्केटला कमी जात असल्याने आले दरात सुधारणा झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मागील महिन्यात आले दरात घट होताना दिसून येत होती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या सप्ताहापासून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर आले पिकांच्या दराची दिशा काय राहील याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दहा टक्के खोडवा आल्याचे क्षेत्र शिल्लक

दर वाढतील या आशेवर खोडवा आले अत्याप शेतकऱ्यांनी ठेवले आहे. या आल्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळीत चांगले दर मिळण्याची आशा असते. खोडवा आल्याच्या दरात सुधारणा झाली आहे.

या आल्यास प्रतिगाडीस ४५ ते ४६ हजार रुपये दर मिळत आहे. मात्र या आल्याचे खूप थोडे म्हणजे अवघे पाच ते दहा टक्के असून सततच्या पावसामुळे आले काढता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : रिश्ते नये, सोच वही !

Soybean Market : सोयाबीनमध्ये सबुरीची गरज

Agriculture Commodity Market : सोयाबीन, तुरीच्या भावातील घसरण कायम

Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University : कार्यकारी सदस्य अवमानना प्रकरणी कुलगुरू डॉ. गडाख यांच्याविरुद्ध हक्कभंग आणू; मिटकरी यांचा इशारा

Crop Residue Burning : शेतकऱ्यांवर कारवाई करणे हा उपाय नव्हे

SCROLL FOR NEXT