Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस भावाला कमी आवक, निर्यातीचा आधार

Cotton Rate : देशातील बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. पण कापसाचे भाव वायदे आणि बाजार समित्यांमध्ये अस्थिर आहेत.

अनिल जाधव

Pune News : देशातील बाजारात कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. पण कापसाचे भाव वायदे आणि बाजार समित्यांमध्ये अस्थिर आहेत. केवळ भारतातच नाही तर अमेरिका, चीन, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कापूस भावात चढ-उतार सुरू आहेत. अमेरिकेच्या कापूस बाजारावर ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा दबाव दिसतो. तर देशात साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशनने पुन्हा एकदा कापूस उत्पादन जास्त असल्याचा दावा केला.

अमेरिकेच्या कापूस भावावर सध्या काही प्रमाणात ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाच्या कापसाचा दबाव येत असल्याची चर्चा आहे. कारण यंदा ब्राझीलमध्ये कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर जुलैपासून येथील कापसाची काढणी सुरू होईल. म्हणजेच कापूस बाजारात येईल. ब्राझीलच्या कापसाचे भावही काही दिवसांपासून काहीसे नरमले. ऑस्ट्रेलियाचा कापूसही याच वेळी बाजारात येईल.

यंदा अमेरिकेचे उत्पादन घटले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव सुधारले आहेत. मागणीही चांगली आहे. या दोन्ही देशांचा कापूस बाजारात दाखल झाल्यानंतर पुरवठा वाढेल. यामुळे अमेरिकेच्या वायदे बाजारात कापूस वायद्यांमध्ये पुढच्या महिन्यांतील व्यवहारांमध्ये चढउतार दिसून येत आहेत. पण सध्या कापसाचा पुरवठा कमी असल्याने भाव त्या प्रमाणात कमी झाले नाहीत.

साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशन पुन्हा एकदा कापूस बाजारात मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहे. कारण या संघटनेने उद्योगांना पुन्हा एकदा चढ्या भावात कापूस खरेदी करू नये, असे आवाहन केले. तसेच केंद्र सरकार आणि सीओसीपीसी यांच्या कापूस उत्पादन अंदाजावरच विश्वास ठेवावा, कारण हे अंदाज जास्त विश्‍वासार्ह आहेत, असेही सांगितले. तसेच सध्या कापूस बाजारात जास्त प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याने कापसाचा भाव वाढत असल्याचाही दावा या संघटनेने केला. तसेच कापसाला वाढलेल्या भावात मागणी कमी झाल्याचेही सांगितले जात आहे.

बाजारातील आवक कमी

बाजारातील कापसाची आवक कमी झाली आणि मागणी चांगली आहे. त्यामुळे दर पुन्हा पूर्वपातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील आवक पुन्हा कमी होताना दिसत आहे. देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवल्यानंतर काही दिवस बाजारातील आवक वाढली होती. पण शेतकऱ्यांकडे कापूसच कमी प्रमाणात शिल्लक असल्याने आवक पुन्हा एकदा कमी झाली. कालची देशातील बाजारातील आवक ६३ हजार २०० गाठी होती. तर मागच्या आठवड्यातील आवक ७० हजार गाठींपेक्षा जास्त होती.

कापूस बाजार कसा राहील?

कापसाची देशातील आवक पुढील काळातही कमी होत जाणार आहे. याचा आधार कापूस भावाला मिळेल. निर्यातीसाठीही चांगली मागणी मागणी आहे. याचाही सपोर्ट मिळेल. त्यामुळे कापसाचे भाव एप्रिल महिन्यात पुन्हा सुधारू शकतात. तर मे महिन्यात कापसाचा भाव सध्याच्या पातळीवरून ५ ते ७ टक्के वाढू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाची भावपातळी

मागील दोन आठवडे कापसाच्या भावातील नरमाई कायम होती. पण आज महत्त्वाच्या अनेक बाजारांमध्ये कापसाच्या सरासरी भावात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. सरासरी भावपातळी आज ७ हजार ३०० ते ७ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान होती. काही बाजारांमध्ये कमाल भाव ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर किमान भाव आजही ७ हजारांपासून सुरू होत आहे. कापसाचे भाव गाव, बाजार समित्या आणि जिनिंगच्या पातळीवर तसेच कापसाच्या गुणवत्तेनुसार कमी जास्त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT