Garlic Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

Garlic Import from Afghanistan : देशभरातील लसणाचे घटलेले उत्पादन आणि बाजारातून वाढलेल्या मागणीमुळे लसणाचे दर वाढत होते. वाढत्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून लसणाची आयात होऊ लागली आहे.

गणेश कोरे

Pune News : देशभरातील लसणाचे घटलेले उत्पादन आणि बाजारातून वाढलेल्या मागणीमुळे लसणाचे दर वाढत होते. वाढत्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातून लसणाची आयात होऊ लागली आहे.

परिणामी लसणाचे दर तुलनेने नियंत्रणात आले आहेत. पुणे बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२६) अफगाणिस्तानातील सुमारे ३० आणि स्थानिक लसणाची सुमारे १०० टन आवक झाली. या वेळी प्रति किलोला अनुक्रमे ३२० ते ३६० आणि २५० ते ३५० रुपये दर होते, अशी माहिती प्रमुख अडतदार समीर रायकर आणि राजेंद्र कोरपे यांनी दिली.

याबाबत रायकर म्हणाले, की लसणाच्या दरवाढीमुळे अफगाणिस्तानातील लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतात दाखल होऊ लागला आहे. यामुळे टंचाई कमी होऊन, दर नियंत्रणात झाले आहेत. अन्यथा, किरकोळ बाजारातील लसणाच्या दरात मोठी वाढ होऊन प्रति किलोचे दर ५०० रुपयांच्या पुढे गेल्याची शक्यता होती.

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाचे दर उच्चांकी पातळीवर म्हणजेच ४०० रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहेत. नवीन आवक सुरू होईपर्यंत पुढील दोन महिने दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.’’

लसणाची सर्वाधिक लागवड गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबात केली जाते. गेले दोन वर्षे लसणाला कमी दर मिळाल्याने तेथील शेतकऱ्यांनी लसणाची लागवड कमी केली. लसणाचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. गेल्या वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडे लसणाचा फारसा साठा नव्हता. त्यामुळे यंदा लसणाचे तेजीतील दर टिकून होते. लसणाचा हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी आहे.

फेब्रुवारीपर्यंत दर चढेच...

पुणे बाजार समितीमध्ये लसणाची प्रामुख्याने आवकही मध्य प्रदेश आणि गुजरात येथून होत असते. ही आवक साधारण ५० ते ७० टन होत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन लसणाचा हंगाम सुरू होईल. फेब्रुवारीत आवक वाढल्यानंतर लसणाचे दर कमी होतील. चांगले दर मिळाल्याने उत्तरेकडील शेतकऱ्यांनी यंदा लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. ही आवक सुरू झाली की दर नियंत्रणात येतील असे रायकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT