Garlic Market : नाशिक बाजार समितीत लसूण आवक घटल्याने दरात तेजी

Garlic Rate : कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान लसणाची आवक ६३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८,००० ते ३७ हजार ५०० तर सरासरी दर ३२,००० रुपये राहिला.
Garlic
Garlic Agrowon
Published on
Updated on

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान लसणाची आवक ६३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८,००० ते ३७ हजार ५०० तर सरासरी दर ३२,००० रुपये राहिला. त्यामागील सप्ताहात आवक ११० क्विंटल होती. तर सरासरी दर ३१,००० रुपये क्विंटल होता. आवक कमी होत असून क्विंटलमागे पुन्हा १,००० रुपयांची वाढ झाली आहे.

सप्ताहात भाजीपाल्यासह फळांच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक १० हजार १२३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४,०० ते ७,००० असा तर सरासरी दर ५,३०० रुपये राहिला.

घेवड्याला प्रतिक्विंटल १,५०० ते ३,५०० तर सरासरी दर २,३५० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक २०१ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,२०० ते ४,३०० रुपये तर सरासरी दर ३,००० रुपये मिळाला.

Garlic
Garlic Cultivation : उत्तम उत्पादनासाठी लसूण लागवडीचे तंत्र

उन्हाळ कांद्याची आवक २०८१ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल ४,५०० ते ५,६५५ तर सरासरी दर ५,००० रुपये राहिला. पोळ कांद्याची आवक ३,२०२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,१०० ते ४,२०० तर सरासरी दर ३,८०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९,४०९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,२०० ते २,९०० तर सरासरी दर २,६५० रुपये राहिला.

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ५० ते ५५० तर  सरासरी २५०, वांगी ७०० ते १,१०० तर सरासरी ८५०, फ्लॉवर १६० ते ४१० सरासरी २८० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १५० ते ३०० तर सरासरी २५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.

Garlic
Garlic Disease Management : लसूण पिकावरील कीड-रोग व्यवस्थापन

ढोबळी मिरचीला ४०० ते ६०० तर सरासरी दर ५०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १५० ते २५० तर सरासरी २००, गिलके २५० ते ४०० तर सरासरी ३२०, दोडका ४०० ते ६०० तर सरासरी दर ५०० रुपये, असे प्रति १२ किलोस दर मिळाले.

फळांमध्ये केळीची आवक १,५३० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते १,९०० तर सरासरी दर १,५०० रुपये मिळाला. सफरचंदाची आवक १,८५१ क्विंटल झाली. त्यास ६,००० ते १५,००० रुपये तर सरासरी १०,००० रुपये दर मिळाला. डाळिंबाची आवक ४,३०४ क्विंटल झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com