Masoor  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Masoor Import Duty : अमेरिकेतून आयात मसूरवरील आयात शुल्क हटविले

Masoor Market Update : देशात मसूरची आयात मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, कॅनडातून होते. मात्र अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे अमेरिकेतून आयात होणाऱ्या मसूरवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशात मसूरची आयात मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, कॅनडातून होते. मात्र अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे अमेरिकेतून आयात होणाऱ्या मसूरवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता अमेरिकेतून सुद्धा मसूरची आयात होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी अमेरिकेतून आयात होणाऱ्या काबुली हरभऱ्यावर इतर देशांप्रमाणे ४० टक्‍के शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय बाजारात उपलब्धता, आयात धोरणात सातत्याने होणाऱ्या बदलाच्या कारणामुळे मसूरचे व्यवहार दबावात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच खासगी बाजारात मसूरचे दर ६३२५ ते ६३५० याप्रमाणे आहेत.

त्याचवेळी मूग, उडीद आणि तुरीच्या नव्या हंगामाला उशीर असल्याने याची बाजारातील आवक जेमतेम असल्याचे सांगितले जात आहे. कळमना बाजार समितीत सध्या हरभरादर प्रतिक्विंटल कमाल ५५०० ते ६१०० रुपयांवर स्थिर आहेत. यापूर्वी हरभरादर ५००० ते ५७०० रुपये असा होता.

तुरीने गेल्या काही दिवसांत चांगलीच तेजी घेतली आहे. कळमना बाजाराचा विचार करता ४ सप्टेंबरपासून तुरीचे दर सरासरी ११४५१ ते १२०५१ असे स्थिर राहिले. बाजारात नव्या हंगामातील तुरीची आवक होईस्तोवर हा दर स्थिर राहील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

मुगाची आवक ७ क्‍विंटलवरून १ क्‍विंटलपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे मुगाचे दर ६२०० ते ६४०० रुपयांवरून आता चांगलेच तेजीत येत थेट ८८०० ते ९००० रुपयांवर पोहोचले आहेत. मुगाची आवक सध्या केवळ एक क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: शेती सुखाची करणे शक्य आहे का?

Mango Management: वाढीच्या अवस्थेत आंबा बागेचे व्यवस्थापन आणि जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन कसे करावे?

Agrowon Diwali Article: संघर्षातून बहरली समाधानी आयुष्याची बाग

Sugarcane Crushing Season: गाळप हंगामासाठी नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचे अर्ज

Agrowon Diwali Article: सर्वांगीण उन्नती साधणारी राजपुतांची शेतीसंस्कृती

SCROLL FOR NEXT