Team Agrowon
भारतात तुरीला पर्याय म्हणून काही भागांमध्ये मसूरला पसंती दिली जाते. त्यामुळे तुरीच्या बाजारासाठी मसूरचे दर महत्त्वाचे आहेत. पण यंदा देशात मसूरचे उत्पादनही मागणीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
सूरची गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे मसूरच्या दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
सध्या मसूरला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ८०० ते ६ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे.
देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे आयात करूनही गरज पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. सरकार तुरीचे भाव कमी करण्यासाठी विविध उपायांची चाचपणी करत आहे.
देशातील काही भागांमध्ये तुरीला पर्याय म्हणून मसूरचा वापर होऊ शकतो. असा तो होताना दिसतो. यंदा देशात मसूरचे उत्पादन वाढल्याचा दावा सरकारने केला.
मागील हंगामात देशात जवळपास १३ लाख टन मसूरचे उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादन १६ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला.