Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Quota: एप्रिलमध्ये साखरेचा मोठा कोटा; तब्बल २७.५ लाख टन विक्रीस उपलब्ध!

Sugar Price Rise: केंद्र सरकारने एप्रिलसाठी २३.५० लाख टन साखर कोटा मंजूर केला असून, मार्चमधील शिल्लक कोट्यास १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. उन्हाळ्यामुळे वाढती मागणी आणि उत्पादनातील तूट यामुळे साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: केंद्र सरकाने एप्रिल महिन्यासाठी २३.५० लाख टनांचा साखर कोटा दिला आहे. मार्चमधील शिल्लक साखर कोट्यासही १० एप्रिलपर्यंत विक्रीस मुदतवाढ दिली आहे. उन्हाळ्यामुळे साखरेला वाढती मागणी राहण्याची शक्यता असल्याने दरात काहीशी वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांची आहे.

केंद्राने मार्च महिन्यासाठी २३ लाख टन साखरेचा कोटा दिला होता. मागणीच्या तुलनेत दिलेला कोटा कमी असल्यामुळे साखरेचे दर महिनाभर तेजीत स्थिरावले आहेत. शिवाय, मार्च महिन्यातील कोट्यातील साखर फारशी शिल्लक राहिली नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

मार्चमधील साखर दहा एप्रिलपर्यंत विकता येणार असली तरी उन्हाळ्यामुळे साखरेला मागणी वाढण्याची शक्यता असल्याने याचा फारसा परिणाम दर घसरणीवर होऊ होणार नाही, असा साखर उद्योगाचा अंदाज आहे.

सध्या देशभरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे यामुळे आइस्क्रीम व शीतपेय उद्योगातून साखरेला मागणी वाढण्याची शक्यता आहे. देशाचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या उत्पादनात मोठी तूट राहण्याचा अंदाज आहे. सध्याची साखर उत्पादनाची आकडेवारी पाहता यंदा साखर उत्पादनात घट होईल हे निश्‍चित असल्याने पुरेशा प्रमाणात साखर बाजारात येण्याची शक्यता कमी आहे.

अपेक्षेप्रमाणे साखरेला दर येत असल्याने कारखानेही साखर शिल्लक ठेवण्याच्या मानसिकतेत नाहीत. उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्येही साखरेची विक्री सातत्याने ४००० रुपये क्विंटलच्या वर होत आहे. यामुळे उन्हाळा संपेपर्यंत जितकी साखर विकता येईल तितकी विकण्याचा प्रयत्न कारखान्याचा आहे. साखरेचे दर वाढत असल्याने केंद्राने ‘एमएसपी’ वाढी बाबत मात्र अद्याप कोणती भूमिका जाहीर केली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT