Tur Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Production : तूर उत्पादन यंदा किती होणार?

देशातील खरिपाचा पेरा आता आटोपला असचं म्हणावं लागेल. यंदा कडधान्याचा पेरा चार टक्क्यांनी तर तुरीची लागवड साडेचार टक्क्यांनी कमी झाली. मागील हंगमात ४८ लाख २२ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशात यंदा तुरीची लागवड (Tur Cultivation) कमी झाली. त्यातच पावसानंही पिकाचं नुकसान (Tur Crop Damage) झालंय. त्यामुळं केंद्र सरकारनं यंदा गेल्यावर्षीपेक्षा तूर उत्पादन (Tur Production) साडेचार लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मात्र सरकारचा हा अंदाज उद्योग आणि जाणकारांना मान्य नाही.

देशातील खरिपाचा पेरा आता आटोपला असचं म्हणावं लागेल. यंदा कडधान्याचा पेरा चार टक्क्यांनी तर तुरीची लागवड साडेचार टक्क्यांनी कमी झाली. मागील हंगमात ४८ लाख २२ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. मात्र यंदा केवळ ४६ लाख हेक्टरवरच तुरीचं क्षेत्र स्थिरावलं. तूर लागवड कमी होण्यामागं गेल्या हंगामातील सरकारचं धोरणं कारणीभूत ठरलं.

केंद्र सरकारनं मागील हंगामात विक्रमी ४३ लाख ४० हजार टन तूर उत्पादन झाल्याचं म्हटलंय. तर विक्रमी ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली. आयातीचं धोरण ऐन हंगामातच जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना हमीभावही मिळाला नाही.

त्यातच सुरुवातीच्या टप्प्यात पावसानं खंड दिला. पेरणीयोग्य पाऊस उशीरा झाल्यानंही लागवडीवर परिणाम झाला. परिणामी यंदा तुरीची लागवड कमी झाली.

तुरीची लागवड कमी झाल्यानंतर केंद्र सरकारनंही यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केलाय. यंदा देशातील तूर उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा तब्बल साडेचार लाख टनाने कमी राहण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या मते यंदा ३८ लाख ९० हजार टन तूर उत्पादन होईल. देशाला दरवर्षी जवळपास ४५ लाख टन तुरीची गरज असते. म्हणजेच उत्पादन गरजेपेक्षा कमी राहील. मात्र सरकारचा हा अंदाज जाणकारांना मान्य नाही.

लागवड कमी झाल्यानंतर सततच्या पावसानं महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकाचं नुकसान झालंय. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाला. याच पावासमुळं तूर पिकाचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

तर जाणकारांच्या मते देशात २५ ते २७ लाख टनांपेक्षा अधिक तूर उत्पादन होणार नाही. या परिस्थितीत गेल्यावर्षीप्रमाणं आयात झाली तरी तुटवडाच भासेल.

देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सध्या बाजारांमध्ये ७ हजार ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असल्यानं दराला आणखी आधार मिळू शकतो.

शेतकऱ्यांनी तुरीची विक्री बाजाराचा आढावा घेऊन केल्यास ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

देशात यंदा गेल्यावर्षीपेक्षा २० ते २५ टक्क्याने उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. देशातील तूर उत्पादन २५ लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळं तूर उत्पादकांना यंदा चांगला दर मिळेल.
दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT