MSP Rabbi 2025 Agrowo
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Rabbi 2025 : रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २१० रुपये तर गव्हाच्या १५० रुपये वाढ

बार्लीसाठी प्रतिक्विंटल १३० रुपये, मोहरीसाठी प्रतिक्विंटल ३०० रुपये तर करडईसाठी प्रतिक्विंटल १४० रुपये हमीभाव वाढ जाहीर केली आहे.

Dhananjay Sanap

केंद्र सरकारने २०२५-२६ च्या रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभुत किंमतीमध्ये म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. त्यानुसार गव्हासाठी १५० रुपये, मसूरसाठी २७५ रुपये तर हरभरासाठी २१० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. २०२५-२६ च्या रब्बी गव्हासाठी प्रतिक्विंटल २ हजार ४२५ रुपये, हरभरासाठी प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये तर मसूरसाठी प्रतिक्विंटल ६ हजार ७०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१६) आर्थिक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. या बैठकीने रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीस मान्यता दिली आहे.

तसेच बार्लीसाठी प्रतिक्विंटल १३० रुपये, मोहरीसाठी प्रतिक्विंटल ३०० रुपये तर करडईसाठी प्रतिक्विंटल १४० रुपये हमीभाव वाढ जाहीर केली आहे. २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी बार्लीला प्रतिक्विंटल १ हजार ९८० रुपये, मोहरीसाठी ५ हजार ९५० रुपये तर करडईसाठी ५ हजार ९४० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे.

२०२४-२५ रब्बी हंगामातील हमीभाव

केंद्र सरकारने २०२४-२५ च्या रब्बी हंगामासाठी गव्हासाठी २ हजार २७५ रुपये, बार्लीसाठी १ हजार ८५० रुपये, हरभरासाठी ५४४० रुपये, मसूरसाठी ६ हजार ४२५ रुपये, मोहरीसाठी ५ हजार ६५० रुपये तर करडईसाठी ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला होता.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामासाठी गव्हाच्या हमीभावात १०५ टक्के, बार्ली ६० टक्के, हरभरा ६० टक्के, मसूर ८९ टक्के, मोहरी ९८ टक्के आणि करडई ५० टक्के वाढ केल्याचा दावाही केंद्र सरकारने केला आहे. तसेच उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचाही केंद्र सरकारचा दावा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

Banana Farming : कांदेबाग केळी पिकासाठी शेणखताची शोधाशोध

Papaya Farming : खानदेशात पपई पीक फळकाढणीवर

Jal Samadhi Protest : आडोळ खुर्द ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT