Gold Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने दर ६३ हजारांवर स्थिर

Gold Market : केळी, भरीत वांगी आणि कापूस आणि ड्रीप-पाईपसह शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने दराने पुन्हा ६३००० हजार रुपये प्रतितोळ्याचा (१० ग्रॅम) टप्पा गाठला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : केळी, भरीत वांगी आणि कापूस आणि ड्रीप-पाईपसह शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने दराने पुन्हा ६३००० हजार रुपये प्रतितोळ्याचा (१० ग्रॅम) टप्पा गाठला आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो ७६००० रुपयांवर पोहोचला आहे.

डिसेंबरच्या अखेरपासून सोने दरात वाढ सुरू आहे. मध्यंतरी दर काहीसे कमी झाले होते. परंतु त्यात दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे. या महिन्यात सोने-चांदी दरात फारशी वाढ नव्हती. सोने दरात एक तोळ्यामागे २२०० रुपयांनी तर चांदी दरात एक किलोमागे ४४०० रुपयांनी घट झाली होती.

तसेच मागील आठवड्याभरात सोने एक तोळ्यामागे शंभर रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदी दरात एक किलोमागे १००० रुपयांनी वाढ झाली आहे. लग्नसराईचा कालावधी सुरू असल्याने सोने दरात घसरण होईल, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. परंतु सोने दर ६३ हजार रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहेत.

मागील आठवड्यात २४ आणि २५ जानेवारी रोजी सोने दरात एक तोळ्यामागे ५० रुपयांची घट दिसली. २६ जानेवारी रोजी मात्र सकाळी दरवाढ झाली आणि संध्याकाळी लागलीच दरात एक तोळ्यामागे १०० रुपयांची घसरण झाली. बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ५७,८५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,१०० रुपये प्रतितोळा आहे.

चांदीचा दरात वाढीचा कल

जानेवारीत चांदी दरात मोठी वाढ झाली नाही. गत आठवड्यात चांदी दरात काहीशी घसरण झाली. २३ जानेवारी रोजी चांदी दर एक किलोमागे ५०० रुपयांनी घटले. २४ जानेवारीला दरात ३०० रुपयांची सुधारणा झाली.

२५ जानेवारी रोजी चांदीदर एक किलोमागे ७०० रुपयांनी वधारले, २६ जानेवारी रोजी दरात पुन्हा चढउतार झाला नाही. परंतु मागील आठवड्यातील काही दिवसांत चांदी दरात एक किलोमागे १००० रुपयांनी सुधारणा झाल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT