Gold Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : सोने दर पोहोचले ६४ हजारांवर

Gold Market Update : सोने दर आखातातील युद्धानंतर वधारले. मध्यंतरी दरात किंचित घटही झाली. सलग ४० दिवस सोने दर कमी झाले.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : सोने दरात या आठवड्यात तेजी आली आहे. दर एकाच दिवसात एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ८५० रुपयांनी वधारले असून, जळगावातील सुवर्ण बाजारात आता दर प्रतितोळा ६४ हजार ६५० रुपये झाला आहे.

सोने दर आखातातील युद्धानंतर वधारले. मध्यंतरी दरात किंचित घटही झाली. सलग ४० दिवस सोने दर कमी झाले. दर ६३ हजार रुपये प्रतितोळावर पोहोचले होते. मध्यंतरी दर ६३ हजार २०० रुपये प्रतितोळा असे होते. परंतु त्यात घसरणही मागील महिन्यात झाली. फेब्रुवारीत कुठलीही वाढ सोने दरात दिसली नाही.

मार्चच्या सुरुवातीलाच मात्र दरात तेजी आली आहे. मंगळवारी (ता. ५) सोने दर एक तोळ्यामागे ८५० रुपयांनी वधारले व ६४ हजार ६५० रुपये प्रतितोळा झाले. सध्या सोने दर उच्चांकी स्थितीत पोहोचले आहेत. दराने ६४ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. सोने दरात मागील शनिवारी (ता. २) वाढीचा कल सुरू झाला. त्यात मंगळवारपर्यंत वाढ सुरूच राहिली. पुढेही वाढ होईल, असे संकेत आहेत.

चांदीच्या दरात घट

चांदी दर मात्र वधारलेले नाहीत. चांदी दरात एक किलोमागे ७०० रुपयांची घसरण या आठवड्यात झाली आहे. चांदीचे दर येथील सुवर्ण बाजारात प्रतिकिलो ७२ हजार ८०० रुपये आहेत. चांदीचे दर फेब्रुवारीतही स्थिर होते. या महिन्यात त्यात घट दिसत आहे.

अमेरिकेतील वित्तीय संकटांमुळे दरवाढ

आखातातील अस्थिर स्थितीसह अमेरिकेतील वित्तीय संकटे, बँकांमधील दिवाळखोरी, व्याजदरातील वाढ यामुळे सोने दरात ही तेजी आली आहे. अमेरिकेत प्रमुख दोन बँका संकटात आहेत. त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली असून, सोने दरात पुढे आणखी वाढ होईल, असेही सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT