SIR Voter List Revision Controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या ‘गर्जना मोर्चा’च्या निमित्ताने रविवारी (ता. ४) राज्यातील सर्व विरोधी पक्ष एका मंचावर आले. संपूर्ण एसआयआर प्रक्रियाच रद्द करावी आणि ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. .तसेच ‘एसआयआर’मध्ये बांगलादेशींच्या नावाखाली भारतीयांची नावे वगळली जात आहेत. आजचा मोर्चा फक्त पाऊल आहे, नाइलाजाने उद्या हात उचलावा लागेल, असा इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला..केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह आयोगाच्या कारभाराविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी, मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शेकाप आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे ठाकरे बंधूंचा हा गर्जना मोर्चा राज्यातील सर्वच विरोधी पक्षांचा मोर्चा बनला..Indian Politics: ज्ञानेशकुमार आणि मतदारयाद्यांचे ‘शुद्धीकरण’.या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, ‘शेकाप’चे जयंत पाटील यांच्यासह डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सांवत, आमदार अनिल परब, भास्कर जाधव, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नेते, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले. कोणताही राजकीय झेंडा न घेता सर्व कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मतचोरीचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांच्यासह भाजपवर निशाणा साधणारे फलकही मोर्चाच्या ठिकाणी झळकत होते.उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्तीच पक्षपातीपणाने झाल्याचा आरोप केला. भाजपचे सरकार हे सूड उगविण्याचे काम करत असून, ज्ञानेश कुमार हे त्यांच्या हातातील हत्यार असल्याचे सांगितले. बांगलादेशी घुसखोरांना काढण्यासाठी ‘एसआयआर’ सुरू असल्याचे सांगितले गेले. मग, आतापर्यंत किती बांगलादेशींना हुडकून काढले याचे उत्तर द्या, असा प्रश्न करताना बांगलादेशींच्या नावाखाली भारतीयांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जात आहे, असा आरोप त्यांनी केला..Maharashtra Politics: फरफट नेमकी कुणाची....देशात सत्ता कोणाची याचा निर्णय मतदारांनी घ्यायचा असतो, निवडणूक आयोगाने नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असेल तर उद्या कोणाचीही सत्ता आली तरी आम्हाला फरक पडत नाही; मात्र सत्ता योग्य मार्गाने आली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे या दोघांनीही आपल्या भाषणात ईव्हीएमला तीव्र विरोध असल्याचे सांगत यापुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी केली. तर, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाला सत्तेच्या नियंत्रणाखाली आणले गेल्याचा आरोप करतानाच वोटचोरीतूनच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्याचा आरोप केला..सत्तेत कोण हे आयोग कसा ठरवतो?निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात. सत्तेत कोण आणि विरोधात कोण हे जनता ठरवेल. निवडणूक आयोग कसा ठरवतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच आयोगावर बोलल्यानंतर भाजपवाले का उत्तर देतात, असा सवालही त्यांनी केला..हुकूमशाही गाडून टाकूउद्धव ठाकरे म्हणाले, की बाकी सगळे ‘मेक इन इंडिया’ ठीक आहे. पण त्याच्या आडून हुकूमशहा बनत असाल तर तुमची हुकूमशाही गाडून टाकली असे समजा. संपूर्ण देशातून या सगळ्यांनी मिळून १३ कोटी मतदार वगळून टाकले आहे. म्हणजे महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मतदार यांनी वगळले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.