Gold Rate : अचानक सोन्या चांदीचे दर का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात

sandeep Shirguppe

सोन्याचे दर वाढले

जागतिक बाजारातील तेजीमुळे भारतात सोन्याच्या भावाने प्रति दहा ग्रॅम ८०० रुपयांनी उसळी घेत, ६५ हजार रुपयांची नवी विक्रमी पातळी गाठली.

Gold silver Rate | agrowon

चांदीही वाढली

चांदीचा भावही प्रति किलो ९०० रुपयांनी वाढून ७४,९०० रुपये झाला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

Gold silver Rate | agrowon

६५ हजार दर

नवी दिल्लीतील बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ८०० रुपयांनी वाढून ६५,००० रुपयांवर गेला.

Gold silver Rate | agrowon

जागतिक बाजारात रेलचेल

आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स येथे स्पॉट गोल्ड प्रति औंस २११० डॉलरवर व्यवहार करत होते.

Gold silver Rate | agrowon

एक टक्क्यांनी दरात वाढ

मागच्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६४,२०० रुपयांवर बंद झाला होता. त्यात एक टक्क्यांनी वाढ झाली.

Gold silver Rate | agrowon

यामुळे सोने दर वाढला

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदरात कपात करेल या वाढत्या अपेक्षेमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

Gold silver Rate | agrowon

अमेरिकेच्या बाजारपेठेत घडामोड

अमेरिकेमधील औद्योगिक आणि बांधकाम खर्च कमी होण्याची चिन्हे आणि महागाईचा दबाव कमी झाल्यामुळेही सोन्याच्या भाववाढीला चालना मिळाली आहे.

Gold silver Rate | agrowon

Gold silver Rateशॉर्ट सेलिंगवरील भर कमी

तसेच वाढत्या भू-राजकीय तणावामुळे शॉर्ट सेलिंगवरील भर कमी झाला असून, सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

Gold silver Rate | agrowon

चांदीचीही रेलचेल

'एमसीएक्स'वर चांदीचा भाव प्रति औंस २३.८८ डॉलरवर पोहोचला. मागील व्यापारात, तो प्रति औंस २३.०९ डॉलर होता.

Gold silver Rate | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.