Gold Rate : सोने दरात किंचित नरमाईचा कल

Today's Gold Rate : सोने दरात मागील आठवड्यात किंचित नरमाई दिसून आली. दरात रोज किरकोळ घसरण झाली.
Gold Rate
Gold Rate Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सोने दरात मागील आठवड्यात किंचित नरमाई दिसून आली. दरात रोज किरकोळ घसरण झाली. सरतेशेवटी दर ६२ हजार ३०० रुपये प्रतितोळा (एक तोळा, १० ग्रॅम) यावर स्थिरावले.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात रोज किंचित घसरण झाली आहे. मागील ४० दिवसांत सोन्याच्या दरात रोज ३० रुपयांची घसरण होत आहे. आखातात तणाव तयार झाल्याने दरात तेजी आली होती. दर ६३ हजार रुपये प्रतितोळावर पोहोचले होते.

Gold Rate
Jalgaon Gold Rate : सोन्यासाठी प्रसिद्ध जळगावात सोन्याचे दर काय?

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात ही नरमाई दिसली आहे. त्यामागे विविध वित्तीय घडामोडी असून, अमेरिकेत फेडरल बँक नव्या वर्षात व्याजदरात कपात करू शकते. जानेवारीच्या अखेरीस फेडरल बँकेच्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय झाला.

यामुळे सोन्याच्या दरात किंचित नरमाईचा कल तयार झाला. देशात फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा दर ६१ हजार ३०० रुपयांच्या खाली आला आहे. चांदीच्या दरातही घसरण झाल्याची माहिती आहे.

Gold Rate
Gold Rate : सोने दर ६३ हजारांवर स्थिर

नवीन वर्ष संपून ४० दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात सोन्याच्या दरात रोज ३० रुपयांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर ६३ हजार ५३१ रुपये प्रतितोळा असा होता.

यात मागील आठवड्याच्या अखेरिस देशातील वायदा बाजारात सोने दर ६२ हजार २९४ रुपये प्रतितोळा असे झाले. मागील ४० दिवसांत सोने दर एक तोळ्यामागे एक हजार २३७ रुपयांनी कमी झाले आहे. पुढेही सोन्याच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे, असे येथील सराफ बाजारातील जाणकारांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com