Ginger Market News Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Market Rate : आल्याचे विक्रमी दर टिकून

Ginger Price : आले पिकाचे विक्रमी दर गेल्या दोन महिन्यांपासून टिकून असल्याने आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

विकास जाधव 

Satara News : आले पिकाचे विक्रमी दर गेल्या दोन महिन्यांपासून टिकून असल्याने आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे. आले पिकाच्या प्रति गाडीस (५०० किलो) मालाच्या प्रतवारीनुसार ५८ ते ६० हजार रुपये दर मिळत आहे.

आले जमिनीखालील पीक असल्याने एकाबाजूला उत्पादनाचा अंदाज येत नाही तर दुसऱ्या बाजूला दरात टोकाची विषमता निर्माण होत असल्याने ‘आले आलं तर आलं, नाहीतर गेलं’ अशी प्रचलित म्हण आहे. गेल्या चार वर्षांत आले पिकाच्या दरात कमालीची घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग पाच ते सहा वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. दराच्या घसरणीच्या कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते.

मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याचे ठरत होते. परंतु जानेवारीपासून आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली. आले लागवडीसाठी आले बियाणे काढणी सुरू असताना आले (धुणीच्या) दरात आणखी वाढ झाली होती. या काळात बियाण्याचे दर ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडी होते. या वेळी धुणीच्य़ा आल्याचे दर २८ ते २९ हजारांवर गेले होते.

एप्रिलच्या सुरुवातीपासून पुन्हा दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. मेमध्ये आल्यास उच्चांकी म्हणजे प्रतिगाडीस ६० ते ६५ हजार रुपये दर मिळाला. जून सुरू झाला असला तरी आले पिकांस विक्रमी दर टिकून आहे.

सध्या आले पिकास प्रतिगाडी ५८ ते ६० हजार रुपये दर मिळत आहे. सध्या आले पिकांस मागणी जास्त असली तरी क्षेत्र मात्र कमी असल्याने आल्याची टंचाई भासत आहे. यामुळे पुढील काळात दर टिकून राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

नवीन लागवड सुरू

वाढलेले तापमान कमी होत नसतानाही लागवड वेळेत व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन भिजवून आले लागवड केली जात आहे. बियाणे खरेदीच्या वेळी चांगले दर असल्याने जादाच्या दराने बियाणे खरेदी करावे लागले आहेत.

सध्या आले लागवडी शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत. बियाण्याचे वाढील दर व खते, औषधाच्या वाढलेल्या किमती यामुळे एकरी दोन ते अडीच लाख भांडवली खर्च येणार आहे. विक्रमी दरामुळे सधन शेतकऱ्यांचा भांडवली खर्च जास्त असणार आहे. पुढील वर्षी दर टिकून राहिले तर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT