Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Futures Ban : शेतीमाल वायदेबंदीला दोन महिन्यांची मुदतवाढ

Agriculture Commodity Market : ‘सेबी’ने (सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) वायदेबंदीला ३१ जानेवारीलाच पुन्हा मुदतवाढ देत ३१ मार्च २०२५ पर्यंत केली आहे.

Team Agrowon

Pune News : ‘सेबी’ने (सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) वायदेबंदीला ३१ जानेवारीलाच पुन्हा मुदतवाढ देत ३१ मार्च २०२५ पर्यंत केली आहे. वायदेबंदीमुळे महागाई वाढत नाही शिवाय वायद्यांमुळे किंमत जोखीम व्यवस्थापन शक्य होते आणि भविष्यातील किमतीचा अंदाज बांधता येतो, असे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले. तरीही सरकारने वायदेबंदीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

सात शेतीमालाच्या वायद्यांवर डिसेंबर २०२१ मध्ये वायदेबंदी केली होती. यात सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, कच्चे पाम तेल, हरभरा, गहू, बिगर बासमती तांदूळ तसेच मुगाचा समावेश आहे. नुकतेच सरकारने वायदेबंदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

वायदेबंदीची मुदत ३१ जानेवारी आणि केंद्राचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला होता. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात वायदेबंदी उठविण्याची घोषण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र मुदतीच्या दिवशीच ‘सेबी’ने अधिसूचना काढून वायदेबंदीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. आता वायदेबंदी ३१ मार्च २०२५ पर्यंत कायम असणार आहे.

विशेष म्हणजे सरकारने जे कारण देत वायदेबंदी केली होती, ती परिस्थिती बाजारात नाही. वायद्यांमुळे शेतीमालाच्या भावात अवास्तव भाववाढ होते, असे कारण देत वायदेबंदी केली होती. पण मागील तीन वर्षांत वायदेबंदी असतानाही अनेक शेतीमालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेही आणि पडलेही.

त्यातच सोयाबीनसह बहुतांशी शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे वायदे सुरू करण्याची गरज आहे. सरकार एकीकडे मात्र बाजार सुधारणांच्या गप्पा करते आणि दुसरीकडे वायदे बाजार चालू देत नाही, अशी टीका शेतकरी करत आहेत.

‘आर्थिक पाहणी’त वायदे बाजाराचे अप्रत्यक्ष समर्थन

सध्या सोयाबीन, हरभरा, मूग, मोहरी या शेतीमालांचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सरकार वायद्यांवरील बंदी उठवेल, अशी अपेक्षा होती. अर्थमंत्री अर्थसंकल्पात याविषयीची घोषणा करतील, अशी शक्यता होती.

कारण आर्थिक पाहणी अहवालातही शेतीमाल बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजार सारख्या साधनांचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले होते. मात्र सरकारने पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांची निराशा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT