French Apple  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

French Apple in Pune Market : पुणे बाजारात फ्रान्सचे सफरचंद दाखल

France's Premium Zingy Apple in India : रंगाने पिवळसर लाल, चमकदार, चवीने आंबट-गोड असलेल्या या सफरचंद पुढील सहा महिने बाजारात उपलब्ध होणार आहे.

गणेश कोरे

Pune News : फ्रान्सच्या अंजोऊ प्रदेशातून झिंगी वाणाचे सेंद्रिय सफरचंदाची पुणे बाजार समितीमध्ये प्रथमच रविवारी (ता. २२) आवक झाली. रंगाने पिवळसर लाल, चमकदार, चवीने आंबट-गोड असलेल्या या सफरचंद पुढील सहा महिने बाजारात उपलब्ध होणार आहे. किरकोळ बाजारात एक किलो सफरचंदाला ३०० रुपयांचा दर मिळत आहे. फळांचे प्रमुख आडतदार रोहन उरसळ यांनी हे सफरचंद आयात केले आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सिमला आणि काश्मीर येथे सफरचंदाचे उत्पादन घटले आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत सध्या सफरचंदाची टंचाई असून, दर देखील वाढलेले आहे. सफरचंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी उरसळ यांनी थेट फ्रान्स येथून सफरचंदाची आयात केली आहे.

पहिल्या टप्प्प्यात ५०० किलो सफरचंदाची आवक रविवारी झाली. झिंगी सफरचंद हे एका पनेटमध्ये ६ सफरचंदांचे बॉक्समधील आकर्षक पॅकिंग असून सुमारे अडीच किलोचा एक ट्रे अशा पॅकिंगमध्ये ही सफरचंद विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या बाजारात पाचशे किलो सफरचंद विक्रीस आणले असून लवकरच २१ टन सफरचंदाचा कंटेनरची आवक होणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पुढील सहा ते सात महिने हे सफरचंद बाजारपेठांत विक्रीस उपलब्ध असेल, असेही उरसळ यांनी सांगितले.

उरसळ म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत परदेशी फळांची मागणी वाढत चालली आहे. सफरचंदाची झिंगी हे वाण इनाटिसने या फ्रेंच कंपनीने भारतात सादर केले आहे. झिंगी सफरचंदांना आंबट गोड चव आहे. हे सफरचंद आकर्षक पिवळसर लाल रंगांचे असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घ्या

Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार

Electricity Connection : मराठवाड्यात वर्षभरात सव्वा लाख नवीन वीज जोडण्या

Water Crisis Maharashtra : मराठवाड्यातील ११ लघू प्रकल्प अजूनही कोरडे

Green Revolution: शेतकऱ्यांनी उभे केले घनदाट जंगल...

SCROLL FOR NEXT