sandeep Shirguppe
उत्तर भारतातील थंड हवामानाच्या ठिकाणी सफरचंदाच्या बागा मोठ्या प्रमाणात आढळत असतात. दरम्यान या भागातून आपल्याल लाल आणि हिरव्या कलरचे सफरचंद मिळते.
पण सध्या काळ्या सफरचंदांची बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे. या सफरचंदाच्या अनेक जाती असल्याची माहिती समोर आली आहे.
चवीला गोड आणि आरोग्यदायी फायदे असलेल्या काळ्या सफरचंदाला देखील कायम चांगला दर असतो.
काळे सफरचंद अत्यंत दुर्मीळ असल्याने जगातील विशिष्ट भागातच या सफरचंदाची शेती केली जाते. सफरचंदाच्या वाढीसाठी विशेष हवामानाची आवश्यकता असते.
काळे सफरचंद भूतानच्या टेकड्यांमध्ये पिकवले जाते. सफरचंदाच्या या जातीला 'हुआ निऊ' असेही संबोधले जाते.
अत्यंत चवदार आणि रसाळ असलेल्या या सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यात उच्च विरघळणारे फायबर असते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयरोग रोखण्यासाठी तसेच अन्न पचन होण्यास या सफरचंद सेवन करावे.
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए तसेच पोटॅशियम तसेच अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात, ते शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते.
काळे सफरचंद खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५०० रुपये द्यावे लागतात. त्याच्या किंमतीत सतत बदलत राहतात.
याचे उत्पादन अत्यंत कमी होते त्यामुळं ब्लॅक डायमंड सफरचंद खूप महाग आहे. काळ्या सफरचंदाच्या झाडाला फळ येण्यासाठी ८ वर्षे लागतात.