Apple Cultivation : महाराष्ट्रात होऊ शकते का सफरचंदाची लागवड?

Apple Farming : महाराष्ट्रात केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष ही पारंपारिक फळपिके घेतली जातात. पण आधुनिक शेती म्हणून अनेक शेतकऱ्यांमध्ये सफरचंद लागवडीची क्रेझ वाढतेय.
Apple Cultivation
Apple CultivationAgrowon
Published on
Updated on

Apple Fruit : महाराष्ट्रात केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष ही पारंपारिक फळपिके घेतली जातात. पण आधुनिक शेती म्हणून अनेक शेतकऱ्यांमध्ये सफरचंद लागवडीची क्रेझ वाढतेय.  सफरचंद म्हटल की आपल्या डोळ्यासमोर बर्फाळ प्रदेशातल्या लाल - लाल सफरचंदाच्या बागा उभ्या राहतात.  भौगोलिक रचना, हवामान यानुसार आपल्या देशातील पीक पद्धती वेगवेगळी आहे. त्यानूसार सफरचंद हे हिमाचल प्रदेश, काश्मिर या थंड भागात येणार महत्वाच फळपीक आहे.

 पण आपल्याकडे काही शेतकरी थंड प्रदेशातील हे सफरचंद उष्ण भागात घेऊ लागले आहेत.   जुन्नर, नगर, नाशिक, पंढरपूर  या भागातील काही शेकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग केलाय.  या शेतकऱ्यांना सफरचंद लागवडीत यश मिळाल का? किंवा सफरचंद लागवडीचे या शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत? सफरचंद लागवडीबाबत तज्ज्ञांच काय मत आहे? याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.  

सफरचंद लागवडीचा प्रयोग

निरोगी राहण्यासाठी रोज एक सफरचंद खाण आरोग्यासाठी चांगल मानल जात.  त्यामुळे सफरचंदाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील असते. हे सफरचंद सामन्यांसाठी तस महाग फळ.  त्यामुळे चांगला फायदा मिळेल या आशेने अनेक शेतकरी सफरचंद लागवडीकडे वळत आहेत. नाशिक जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर आहे.

याच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वाजगावचे बाळासाहेब देवरे या शेतकऱ्याने २०२० मध्ये  ‘हरमन-९९’ या सफरचंद जातीच्या २०० रोपांची १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली.  शेणखत, निंबोळी पेंडीचा वापर करुन पुर्णपने नैसर्गीक पद्धतीने सफरचंदाच व्यवस्थापन केलं. या सफरचंदावर फळमाशी आणि बुरशीजन्य रोग सोडले तर कीड रोगाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही.  

Apple Cultivation
Apple Crop: बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनं फुलवली सफरचंदाची बाग

पाणी आठवड्यातून ठिबकने ४ ते ५ तास दिल जात. सफरचंदाला वर्षातून दोन वेळा पानगळ होऊन बहार येतो.  पहिला बहार जूनमध्ये येतो आणि ऑक्टोबरमध्ये फळांच उत्पादन मिळत. तर दुसरा बहार नोव्हेबर - डिसेंबर मध्ये येऊन मार्च मध्ये फळांच उत्पादन मिळत.  पानगळ आणि बहाराच व्यवस्थापन पुर्णपने नैसर्गीक पद्धतीने केल जात.  साधारण दोन वर्षानंतर या झाडांना फळधारणा झाली. पण ज्या प्रमाणात फळांच उत्पादन मिळायला हवं होत त्या प्रमाणात मात्र फळे झाडाला लागली नाहीत. सामान्यपने एका झाडाला ६० ते ७० फळे लागतात. पण देवरे यांच्या बागेत एका झाडाला १० ते ३२ फळे लागली.  

एकाच जातीची लागवड न करता वेगवगेळ्या जातीची लागवड केली असती तर फळधारणा वाढली असती असं देवरे यांना आभ्यासातून लक्षात आलं. त्यामुळे यंदा त्यांनी इतर जातीच्याही संफरचंदाची लागवड केलीय. परागीभवन चांगल्याप्रकारे होण्यासाठी त्यांनी बागेत आता मधमाश्यांच्या पेट्याही ठेवल्यात.  हिमाचल, जम्मू या ठिकाणी येणाऱ्या फळांपेक्षा आपल्याकडे येणाऱ्या फळांमध्ये उष्ण वातावरणामुळे गोडवा जास्त असून फळाची सालही पातळ आहे. त्यामुळे फळे कडक न होता जास्त चविष्ट लागत असल्याचं देवरे यांच मत आहे.  देवरे यांच्याकडून प्रेरणा घेत त्याच्या मार्गदर्शनात अनेक भागातील शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केलीय. सफरचंद लागवडीबाबत हा झाला शेतकऱ्याचा अनुभव.

Apple Cultivation
Methi Cultivation : मेथी लागवड फायदेशीर का आहे?

आता पाहुया सफरचंद लागवडीबाबत तज्ज्ञांच मत काय आहे?

सोलापूर येथील कृषी संशोधन केंद्रातील फळपीक तज्ज्ञ एम. एस पाटील सांगतात.  आपल्या कडे केळी, आंबा, द्राक्ष ही पिके जशी व्यावसायीक स्तरावर घेतली जातात तशी संफरचंदाची लागवड होऊ शकत नाही. कारण हिमाचल, जम्मू याठिकाणच्या जमिनी, पाणी तसच वातावरण हे सफरचंद पिकासाठी अनूकुल आहे. यामुळेच याठिकाणच्या सफरचंदाला एक विशिष्ट चव, आकार आणि गोडवा आहे.

व्यावसायीक स्तरावर  जर सफरचंदाच उत्पादन मिळाल तरच आपल्याकडे सफरचंदाची लागवड यशस्वी ठरली असं म्हणता येईल. पण आपल्याकडे येणारी फळे त्या गुणवत्तेची तयार होत नाहीत. फळांना अपेक्षित आकार किंवा गोडवा मिळत नाहीत. अवेळी फळे गळून पडतात. या फळाबाबत संशोधन होण्याची गरज आहे. हौस म्हणून किंवा एक वेगळा प्रयोग म्हणून सफरचंदाची लागवड होऊ शकते पण व्यावसायीक स्तरावर सफरचंद लागवडीला मर्यादा आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे.  

तर कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रस येथील फळपीक तज्ज्ञ डॉ. विजय अमृतसागर सांगतात, या फळाच्या लागवडी बाबत किंवा जातीबाबत विद्यापीठाने कोणतीही शिफारस केलेली नाही. पण तरिही महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केलीय. सफरचंदाच्या फुलधारणेनंतर फळ तयार होताना वातावरणातील फरकामुळे फळात फ्रुक्टोज म्हणजेच साखर योग्य प्रमाणात तयार होत नाही.  त्यामुळे फळे म्हणावी तितकी गोड होतीलच अस नाही.

 याशिवाय आपल्याकडील वातावरणात फळे योग्य आकाराची तयार होत नाहीत. फळांना योग्य आकार येण्यासाठी वाढरोधकाचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर या फळावर संशोधन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेच्या संपर्कात राहून फळाच योग्य व्यवस्थापन केल तर संफरचंदाच महाराष्ट्रातही चांगल उत्पादन घेता येऊ शकतं.  अस मत फळपीक तज्ज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांनी व्यक्त केलय. 

शेतीतील आधुनिक प्रयोग म्हणून अशा प्रकारच्या सफरचंदाच्या लागवडीचे प्रयोग करण्याला हरकत नाही. पण अशा प्रकारच्या लागवडीच्या प्रयोगांच्या बातम्या ऐकून, अनेक शेतकरीही पीक फेरपालट म्हणून असे प्रयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अशा प्रकारच्या प्रयोग किती यशस्वी होतील, याबाबत शंकाच आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com