Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे हरभरा दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, गवार आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनच्या वाद्यांमध्ये नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे पुन्हा दोन आठवड्याच्या निचांकी पातळीवर पोचले. सोयाबीनचे वयादे काल सायंकाळी १०.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान बंद झाले होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसात सुधारणा

कापसाच्या भावातही चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणेजच शुक्रवारी काहीसे वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७३.५२ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५८ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यात चढ उतार कायम

कांदा भावात मागील पाच दिवसांपासून काहीसे चढ उतार आहेत. कांदा मागील आठवड्यात वाढल्यानंतर भाव कायम दिसत आहे. भावाने ५ हजारांची पातळी गाठल्यानंतर मात्र सतत यापेक्षा कमी पातळीवरच बाजार राहिला. आजही बहुतांशी बाजारात कांद्याला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारला चांगला उठाव

बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे. मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटक गवार पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT