Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Rate : गणेशोत्सवाच्या काळात फुलांच्या दरात तेजी

Team Agrowon

Nashik News : गणेशोत्सव काळात गणपती सजावट व गौरींच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची बाजारात सध्या मागणी वाढली आहे. मात्र पावसामुळे सध्या उत्पादनात घट झाल्याने तुलनेत फुलांची आवक मर्यादित आहे. या मागणीमुळे सध्या बाजारात तेजी दिसून येत आहे.

ऑगस्टच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे झेंडू, शेवंती यासह गुलाब फुलशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच गणेशोत्सवाला बाजारात मर्यादित आवक होत असल्याने व तुलनेत मागणी वाढल्याने सध्या दरात सुधारणा झाल्याचे नाशिकमधील गणेश वाडी फूल बाजारात पाहायला मिळत आहे.

झेंडू, शेवंती, गुलाब, जरबेरा, निशिगंध अशा फुलांचा आकर्षकपणा या गुणधर्ममुळेही शोभिवंत फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात सणासुदीला मागणी वाढल्याने फूल व्यवसायाला चांगले दिवस आहेत. सध्या अनेक मंडळांकडून फुलांची आकर्षक सजावट या घरात गणेशोत्सवात सजावट होत असल्याने फुलांची मागणी वाढत असून त्यातून रोजगारनिर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे.

शेवंती, झेंडूला सर्वाधिक मागणी

झेंडू व शेवंतीच्या फुलांना सर्वाधिक मागणी आहे. सध्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात सरासरी ५०० ते ६०० रुपये प्रतिक्रेट असा दर मिळत आहे. तर किलोला १०० ते दीडशे रुपयांपर्यंत आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला दर ८०० रुपये क्रेटपर्यंत होते. गुलाबदरातही तेजी होती.

यंदा लागवडी चांगल्या होत्या. मात्र पावसामुळे यंदा झेंडूच्या लागवडी खराब झाल्या. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न येऊ शकले नाही सध्या बाजारात मागणी आहे मात्र लागवडी खराब झाल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याने मोठा फटका बसला आहे.
सुदाम काटे, झेंडू उत्पादक शेतकरी, मोह, ता. सिन्नर
आवक होत आहे, मागणीच्या तुलनेत गणेशोत्सवात आवक होत आहे, मात्र सध्या नाशिकच्या तुलनेत बाहेर मागणी आहे. सजावटीसाठी मागणी असल्याने दर चांगले मिळत आहेत.
महेश दिवे, फूल विक्रेते, नाशिक

किरकोळ विक्री दर असे (रुपये किलो) :

शेवंती ३५० ते ४००

झेंडू २५० ते ३००

सुटा पाकळी गुलाब ३०० ते ३५०

मोगरा १२०० ते १४००

निशिगंध ८०० ते १०००

सोनचाफा ७ रुपये नग

जर्बेरा १० फुलांचे बंडल २०० रुपये

निशिगंध १० कड्यांचे बंडल २०० रुपये

देशी गुलाब १२ फुले बंडल ३० ते ५०

रंगीत पॉलिहाऊस गुलाब

२० फुले बंडल १५० ते २०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT