Fish Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Price: महिनाभरापासून मासळीचे दर स्थिर

Fish Market: गेल्या महिनाभरापासून मासळीच्या दरात फारसे चढ-उतार झालेले नाहीत. एलईडी मासेमारीवर पायबंद घालण्यात मत्स्य विभागाला यश आल्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसून येत आहे.

राजेश कळंबटे

Sindhudurg News: गेल्या महिनाभरापासून मासळीच्या दरात फारसे चढ-उतार झालेले नाहीत. एलईडी मासेमारीवर पायबंद घालण्यात मत्स्य विभागाला यश आल्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सुरमई प्रतिकिलो ८५०, तर पापलेट प्रतिकिलो १ हजार ३०० रुपये दर आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मासळीच्या दरात चांगलीच सुधारणा झाली होती. सुरमई प्रतिकिलो १२०० ते १३०० तर पापलेट १२०० ते १५०० रुपयांपर्यंत दर गेले होते. त्यानंतर हे दर काही दिवसांतच कमी झाले.

त्यानंतर गेले महिनाभर मासळीचे दर स्थिर राहिल्याचे चित्र आहे. सर्वांत मागणी असलेल्या सुरमईचा दर सध्या प्रतिकिलो ८५० पर्यंत आहे. पापलेट प्रतिकिलो १३००, बांगडा प्रतिकिलो २००, सौंदळा प्रतिकिलो ३००, कोळंबी प्रतिकिलो ३५०, मोरी प्रतिकिलो ३००, मोठी मोरी प्रतिकिलो ५००, असे दर सध्या आहेत.

एलईडी मासेमारीवर कारवाईचा बडगा सध्या मत्स्य विभागाने उगारला आहे. त्याचा परिणाम मासळीच्या दरावर देखील झाल्याचे चित्र आहे. अनेक एलईडी नौका आणि ट्रॉलर्सवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे मासळीचे दर स्थिर राहिले असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. मासळीचे दर आणखी काही दिवस स्थिरच राहतील, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT