Fertlizer
Fertlizer Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fertilizer : खतांच्या किंमती आणखी भडकणार

टीम ॲग्रोवन

नैसर्गिक वायूंच्या (Natural Gas Prices) वाढत्या किमतीमुळे जर्मनीच्या बीएएसएफ कंपनीने अमोनिया उत्पादनामध्ये (Ammonia Production) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षात खतांच्या (Fertilizer Rate) किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.

बीएएसएफ ही जर्मनीमधील कंपनी जगातील सर्वात मोठ्या खत उत्पादक (Fertilizer Producer) कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अमोनिया उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. बीएएसएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, "अमोनिया उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची आवश्यकता भासते. पण नैसर्गिक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे अमोनिया उत्पादन खर्चिक झाले आहे. त्यामुळे कंपनीने या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे."

नैसर्गीक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे खत उत्पादन महाग होत आहे. त्याचा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे. पुढच्या वर्षी खतांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये अनेक ठिकाणी खतांचे प्लांटस आहेत. तिथं अमोनिया उत्पादनासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत नैसर्गिक वायूसाठी केलेल्या खर्चात ८० लाख युरोपियन पौंड्सची वाढ झाली आहे.

तसेच जर शक्य असेल तर नैसर्गिक वायूला पर्याय म्हणून इतर ऊर्जा स्त्रोत जसं की इंधन तेलाचा वापर करता येईल का यावरही विचार चालू आहे. दरम्यान पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी इतर पुरवठादारांकडून अमोनियाची खरेदी करता येते का यावरही कंपनी लक्ष ठेवून आहे. नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे जर्मन सरकारने आणीबाणी जाहीर केली तरी बीएएसएफ कंपनीच्या लुडविगशाफेन या प्लांटवर उत्पादन सुरूच राहील असेही कंपनीच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीचा परिणाम पुरवठ्यावर होऊ नये म्हणून इतर ही उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. जर्मन सरकारने तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या आणीबाणीची घोषणा केली तर बीएसएफ च्या लुडविगशाफेन साइटवर उत्पादन सुरूच राहील, अशी माहिती बीएएसएफचे प्रमुख मार्टिन ब्रुडरमुलर यांनी दिली.

पण नैसर्गिक वायूंच्या किमतीत वाढ होण्यामागचं नेमकं कारण काय?

रशियाच्या गॅझप्रॉमने जाहीर केल्यानुसार, जर्मनी आणि इतर मध्य युरोपियन देशांना नॉड स्ट्रिम पाईपलाईनद्वारे जो गॅस पुरवला जातो त्यात रशिया वीस टक्क्यांची घट करणार आहे. जर्मनी रशियाकडून अंदाजे ५५ % नैसर्गिक वायूंची आयात करतो. यातला बहुतांश गॅस नॉडस्ट्रिम वन पाईपलाईनद्वारे पुरवला जातो. यारा इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीनेही खत उत्पादनात कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT