Tomato Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Market News : टोमॅटोचा शिवारातच साचला लाल चिखल

Tomato Rate : टोमॅटो उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष हे अडचणीचे राहिले आहे. टोमॅटोचा उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला.

मुकूंद पिंगळे

Nashik News : टोमॅटो उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष हे अडचणीचे राहिले आहे. टोमॅटोचा उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. त्यानंतर पुरवठा घटल्याने २०० रुपये किलोपर्यंत दर गेले. आता पुन्हा मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने टोमॅटो उत्पादकांचा खर्च वसूल होत नसल्याने मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. प्रतिकिलोला २ ते ५ रुपये दर मिळत आहे. परिणामी, टोमॅटो तोडणेदेखील परवडत नाही. त्यामुळे शिवारातच टोमॅटोंचा लाल चिखल झाला आहे.

उन्हाळ्यात लागवडीसाठी पाणी कमी असल्याने तुलनेत टोमॅटो लागवडी कमी होत्या. उत्पादकता नसल्याने दरवाढीचा शेतकऱ्यांना ठरावीक फायदा झाला. तेजी असल्याने शेतकऱ्यांनी खरीप लागवडी वाढविल्या.

दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीचा फटका लागवडीला बसला नाही. वातावरण अनुकूल राहिल्याने यंदा उत्पादन चांगले येत आहे. परिणामी, बाजारात आवक वाढल्याने विक्रमी आवक होत आहे. मात्र मिळणारे दर हे अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी लागवडी काढून टाकत आहेत. काही शेतकऱ्यांनी उभ्या लागवडीत जनावरे सोडली आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुन्हा अडीच महिन्यांत २ रुपयांपर्यंत खाली

एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यात प्रामुख्याने टोमॅटो उत्पादन घेतले जाते. मात्र उत्पादन वाढल्याने परराज्यांत मागणी नाही. टोमॅटोचा उत्पादन खर्च प्रति किलो ४ ते ६ रुपये येतो. तो देखील सध्या निघत नाही. प्रतिकिलो १०० रुपयांवर गेलेले दर अडीच महिन्यांतच २ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी अशा...

- कमी पावसामुळे नुकसान कमी. त्यामुले उत्पादन अधिक

- उत्पादन वाढल्याने बाजारात आवकेत वाढ. त्यामुळे दरात मोठी घसरण

- दक्षिण भारतात स्थानिक टोमॅटो काढणी सुरू, तर उत्तरेकडील राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियानात मागणी कमी असल्याने पुरवठा कमी

- उत्पादन खर्च तर दूर. पदरमोड करून पीककाढणीची शेतकऱ्यांवर वेळ

- प्रतिक्रेट तोडणी व वाहतूक खर्च ४० रुपये, मिळणारे दर ४० ते १०० रुपये क्रेट

- प्रक्रिया उद्योगाकडून मर्यादित मागणी; दर समाधानकारक नाही

प्रमुख बाजारांतील दर स्थिती : सोमवारी (ता. १६)

बाजार आवार...आवक (क्विंटल)...किमान...कमाल...सरासरी

पिंपळगाव बसवंत...६७,२४१...१५५...११५५...५५५

पांढुर्ली (सिन्नर)...३,२००...२००...७५०...६००

हिवरगाव...२,९४७...१५०...७५०...६००

नाशिक...२,८५४...१५०...७५०...३७५

मुंबई...२,७०४...१,०००...१,२००...१,१००

पुणे...१,९२९...४००...८००...६००

सोलापूर...४३०...२००...१०००...५००

नागपूर...५००...१,२००...१५००...१,३२५

छञपती संभाजीनगर...१५३...६००....९००...७५०

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

३५ रुपये प्रतिक्रेट नीचांकी दराने टोमॅटो विकण्याची वेळ आली. त्यामुळे खर्चही वसूल नाही. प्रक्रिया उद्योगासंबंधी सुविधा सरकारने शेतकऱ्यांना पुरविणे गरजेचे आहे.
- ऋषिकेश कांडेकर, टोमॅटो उत्पादक, लाखळगाव, ता. जि. नाशिक
यंदा आवारात टोमॅटोची मोठी आवक राहिली. त्यात देशांतर्गत पंजाब, हरियाना, दिल्ली व राजस्थानमध्ये मागणी कमी आहे. त्यातच बांगलादेशमधील निर्यात कमी झाली. अशातच गुजरात व मध्य प्रदेशमधील माल सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातील टोमॅटोला मागणी कमी आहे. परिणामी दर कमी आहेत.
- महेंद्र शिंदे, आडतदार, पिंपळगाव बसवंत बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT