Tomato Market News : पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटोला प्रतिक्रेट सरासरी ६१ रुपयांचा दर

Tomato Market Rate : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गुरुवारी (ता. १२) टोमॅटोची २ लाख ९७ हजार ६४५ क्रेट आवक झाली.
Tomato Market
Tomato Market Agrowon
Published on
Updated on

Nashik News : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत गुरुवारी (ता. १२) टोमॅटोची २ लाख ९७ हजार ६४५ क्रेट आवक झाली. २० किलोच्या प्रतिक्रेटला किमान २० ते कमाल ११५ रुपये तर सरासरी ६१ रुपये मिळाले. सध्या आवक वाढल्याने दरात घसरण पाहायला मिळत आहे.

टोमॅटोची सर्वाधिक आवक होणाऱ्या या बाजार समितीत बंपर आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली. बुधवारी (ता. ११) आवक ३ लाख १८ हजार ९४८ क्रेट झाली.

Tomato Market
Tomato Market : टोमॅटो वगळता सर्व शेतीमालाच्या किमतींत घट

त्यास किमान २० ते कमाल १२१, तर सर्वसाधारण दर ६१ रुपये होता. मंगळवारी (ता. १०) ४ लाख ४२ हजार २९० क्रेट आवक झाली. त्यास किमन २५ ते कमाल १२१ तर सर्वसाधारण दर ६१ रुपये होता. सोमवारी (ता. ९) ८६ हजार ४३९ क्रेट आवक झाली.

Tomato Market
Tomato Market : दिंडोरी बाजार समितीसमोर रस्त्यावर ओतला टोमॅटो

त्यास किमान ३० ते कमाल १२१ रुपये, तर सर्वसाधारण ६१ रुपये दर राहिला. शनिवारी (ता. ७) ३ लाख ६३ हजार ४५२ क्रेट आवक झाली. त्यास किमान २५ ते कमाल १२५ रुपये, तर सर्वसाधारण दर ६१ रुपये राहिला.

शुक्रवारी (ता. ६) ३ लाख १९ हजार ८२३ क्रेट आवक झाली. त्यास किमान २५ ते कमाल १५१ रुपये, तर सर्वसाधारण दर ७१ रुपये राहिला. गुरुवारी (ता. ५) ३ लाख ५३ हजार ३७६ क्रेट आवक झाली. त्यास प्रतिक्रेट किमान ३० ते कमाल १५१ रुपये, तर सर्वसाधारण दर ७५ रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com