Cotton &Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन-कापूसप्रश्नी एल्गार मोर्चा

ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतुचक्र बिघडले असून, केंव्हाही पाऊस अशी स्थिती शेतकऱ्यांसाठी घातक ठरली आहे. पेरणी मागे-पुढे झाल्याने दोन, तीन टप्प्यांत सोयाबीन निघणार आहे.

टीम ॲग्रोवन

बुलढाणा ;- सोयाबीनला (Soybean Rate) प्रति क्विंटल ८ हजार ६०० रुपये आणि कापसाला (Cotton Rate) प्रति क्विंटल १२ हजार ३०० रुपये स्थिर भाव राहावा, यासाठी केंद्र सरकारने तत्काळ आयात-निर्यातीच्या धोरणात (Import Export Policy) बदल करावा, या प्रमुख मागणीसह सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन-कापूस उत्पादकांचा एल्गार मोर्चा धडकणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.

गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला सोयाबीन-कापूस उत्पादकांचा विशाल मोर्चा काढला होता. या आंदोलनाने सरकार हादरले आणि आयात-निर्यातीच्या धोरणात बदल करू सोयाबीन-कापसाला वाढीव भाव घेण्यास आम्ही यशस्वी झालो, असे सांगत तुपकर म्हणाले, अतिवृष्टी, सततचा पाऊस व पूरपरिस्थितीने पिकांची हानी झाली आहे.

ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतुचक्र बिघडले असून, केंव्हाही पाऊस अशी स्थिती शेतकऱ्यांसाठी घातक ठरली आहे. पेरणी मागे-पुढे झाल्याने दोन, तीन टप्प्यांत सोयाबीन निघणार आहे. सोयाबीन किती प्रमाणात येईल, याची शाश्वती नाही. निसर्गाचा मारा बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी केलेला उत्पादन खर्चही भरून निघत नाही.

सध्या सोयाबीनचा बाजारभाव ३५०० ते ४५०० रुपये आहे तर कापसाचा बाजारभाव ७००० ते ८०००० रुपये आहे. यावर्षी सोयाबीनला एकरी ३४ हजार ७००रु. उत्पादन खर्च आला आहे, म्हणजेच प्रतिक्विंटल ५ हजार ७८३ रु. उत्पादन खर्च आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक ५०% नफा या सुत्रानुसार सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार ६०० रुपये आणि यावर्षी कापसाला एकरी ४० हजार ९२० रु. उत्पादन खर्च आला आहे, म्हणजेच प्रतिक्विंटल ८ हजार १८४ रु. उत्पादन खर्च आला आहे.

त्यामुळे उत्पादन खर्च अधिक ५०% नफा या सुत्रानुसार कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार ३०० रुपये स्थिर भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने तसे धोरण तयार करावे, अशी मागणी तुपकर यांनी केली. ६ नोव्हेंबरला बुलढाणा शहरातील मोठ्या देवीला (जगदंबा मातेला) साकडे घालून एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जातीभेद, पक्षभेद, मतभेद विसरून शेतकरी हीच एक जात म्हणून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी याप्रसंगी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT