Cotton Rate : कापूस आवक का घटली?

देशातील काही राज्यांमध्ये कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उत्तरेतील राज्यांमध्ये पूर्व हंगामी कापसाची आवकही घटली. पंजाबमधील कापूस आवक यंदा जवळपास पाच पटींनी कमी झाली.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

सोयाबीनचे दर स्थिर

1. सोयाबीनचा भाव मागील आठवडाभरात ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. तर दुसरीकडं सोयाबीन काढणीला वेग आलाय. मात्र काही ठिकाणी होत असलेल्या पावसानं काढणीच्या कामात व्यत्यय येतोय. देशातील बाजारपेठांमध्येही सोयाबीनची आवक वाढतेय. इंदोर आणि लातूर बाजारातील आवक काहीशी वाढलेली दिसतेय. लातूर बाजार समितीत आज जवळपास ५ हजार टन सोयाबीन विक्रीला आलं होतं. या सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये दर मिळाला. सोयाबीनचा हा दर पुढील काळात टिकून राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton Rate
Onion Rate : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

कांदा दरात सुधारणा

2. यंदाचा हंगाम कांदा उत्पादकांची कसोटी पाहणारच ठरलाय. कांद्याला हंगामाच्या सुरुवातीपासूनच उत्पादनखर्चापेक्षाही कमी दर मिळतोय. यंदा जास्त तापमानामुळं कांदा उत्पादन घटलं. शिवाय कांद्याची टिकवणक्षमताही घटली. चाळीतील कांद्याची सड वाढली. त्यामुळं बाजारातील आवक वाढतच राहिली. मागील १५ दिवसांपासून कांदा दरात काहिशी सुधारणा झालीये. मात्र दर अद्याप उत्पादन खर्चापेक्षाही कमीच आहेत. सध्या कांद्याला सरासरी १२०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवसा टिकून राहू शकतो, असं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं.

मका दर नरमले

3. मका दर सध्या बाजारात काहीसे नरमलेले दिसतात. मका महागल्यानं पशुखाद्यात तांदूळ आणि इतर धान्याचा वापर वाढला होता. त्याचा दबाव बाजार दरावर आलाय. त्यातच पुढील महिन्यापासून नवा मका काढणीला सुरुवात होईल. त्यामुळं सध्या मका टंचाई असली तरी दर कमी झालेले दिसतात. सध्या मक्याला १७०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मात्र यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना किमान २ हजार रुपये दर मिळेल. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन मका विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Cotton Rate
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

दोडक्याच्या दरात तेजी

4. सध्या भाजीपाल्यासह दोडक्याचीही आवक बाजारात कमी होतेय. त्यामुळं सध्या दोडक्याला बाजारात चांगला दर मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आलंय. प्रामुख्यानं सणासुदीच्या काळात मागणी वाढली होती. त्यामुळं दरामध्ये थोडी तेजी दिसून आली. गुरुवारी विक्रीला आलेला दोडक्याला किमान २५०० व जास्तीत जास्त ४००० रुपयांपर्यंत दर मिळाला. दोडक्याची किरकोळ विक्री सरासरी ४० ते ६० रुपयांदरम्यान ग्राहकांना केली जात आहे. सध्या बाजारात पावसामुळे पालेभाज्या तितक्या चांगल्या दर्जाच्या नसल्याने दोडका भाव खात आहे. दोडक्याचे हा दर पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.

कापूस आवक का घटली?

5. देशातील कापूस पिकाला (Indian Cotton Crop) पाऊस आणि कीड-रोगाचा फटाक (Pest Disease Outbreak On Cotton) बसला नाही, असा दावा उद्योगांकडून करण्यात येत होता. मात्र कापूस पिकाला यंदा गुलाबी बोंड अळी (Pink Bollworm), पांढरी माशी आणि पावसामुळं पंजाबमधील कापूस उत्पादनावर (Cotton Production) परिणाम झालाय. पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील बाजारात कापसाची आवक (Cotton Arrival) सुरु झाली. येतील कापूस आवकेचा हंगाम सुरु होऊन महिना लोटलाय. पंजाब आणि हरियानात पूर्वहंगामी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळं या राज्यांमधील बाजारात सप्टेंबर महिन्यात कापूस आवक वाढते. मात्र यंदा पंजाबमधील कापूस आवक घटलीये. यंदा ४ ऑक्टोबरपर्यंत पंजाबमध्ये ४६ हजार क्विंटल नवा कापूस बाजारात आला.

मात्र मागील हंगामात याच काळातील कापूस आवक ही २ लाख ३३ हजार क्विंटलपर्यंत झाली होती. तसचं कापसाचा दरही प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार रुपयांवरून ८ हजार ४०० रुपयांपर्यंत नरमला. मात्र कापूस दर अद्यापही हमीभावापेक्षा जास्त आहेत. दर कमी झाल्यानं मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांनी कापसाची विक्रीही कमी केली. शेतकरी कापसाचे दर वाढण्याची वाट पाहत आहेत. कापसाचा सरासरी दर ९ हजार रुपयांवर पोचल्यास शेतकरी पुन्हा कापसाची विक्री वाढवतील, असा अंदाज येथील व्यापारी व्यक्त करत आहेत. देशातील इतर बाजारांमध्येही कापसाला ८ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. शेतकऱ्यांना यंदा किमान ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com