Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस कट्टीचा शेतकऱ्यांना फटका

खुल्या बाजारात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल अर्धा किलोचे नुकसान सहन करावे लागत आहे. कट्टीच्या नावाखाली खरेदीदार व दलाल प्रति क्विंटल अर्धा किलोची रक्कम कापत आहेत.

Team Agrowon

अमरावती : खुल्या बाजारात कापूस उत्पादक (Cotton Farmer) शेतकऱ्यांना प्रति क्विंटल अर्धा किलोचे नुकसान सहन करावे लागत आहे. कट्टीच्या (Cotton Katti) नावाखाली खरेदीदार व दलाल प्रति क्विंटल अर्धा किलोची रक्कम कापत आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर कापसाचा बाजार (Cotton Market) गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्यासोबतच बाजार समितीचाही सेस बुडत आहे.

या महिन्यात कापसाची आवक मर्यादित आहे. खासगी खरेदीदारांनी आकडे लपवण्याचा फंडा अंमलात आणला आहे.कापसाच्या स्थानिक बाजारात १३ जिनिंग प्रेसिंगपैकी गंगा कॉटस्पिन, शेतकरी सहकारी, नेमाणी, लढ्ढा व एदलजी या जेमतेम पाच जिनिंग सध्या सुरू आहेत. डिसेंबरपर्यंत कापसाची आवक अत्यंत अल्प होती, ती आता किंचित वाढली आहे.

यावर्षी कापसाचा बाजार उशिरापर्यंत चालणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. गत महिन्यापर्यंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीची स्थिती वाईट होती.

१५०० क्विंटल खरेदीची क्षमता असलेल्या व २४ ते ३६ मशिन असलेल्या जिनिंगवर दहा दिवस खरेदी केल्यानंतर एक दिवस गलाई करण्यात आली.

त्यांना यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला आहे. एदलजी व लढ्ढा जिनिंग वगळता उर्वरित तीन फॅक्टरींची खरेदी फार कमी आहे.

शहरात अवैध रेचे जोमात सुरू झाले असून त्यांच्याकडे दररोज किती खरेदी झाली याची मोजदाद नाही.

परवाना नसताना काही दलाल या व्यवहारात सक्रिय झाले असून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून तो जिनिंगला विकण्याचा व्यवसाय जोमात सुरू झाला आहे.

हे दलाल शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना प्रति क्विंटल अर्धा किलो कट्टी कापत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

जिनिंग फॅक्टरींना नोटिसी

सेस बुडत असल्याने खरेदीदारांनी खरे व वास्तविक आकडे द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत बाजार समिती प्रशासनाने जिनिंग प्रेसिंग फॅक्टरींना नोटिसा दिल्या आहेत.

याशिवाय बाजार यार्डमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असून इलेक्ट्रॉनिक काटा खरेदी करण्यात येत आहे. मार्च महिन्यात कापसाचा बाजार समितीत सुरू होऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

SCROLL FOR NEXT