Cotton Rate: कापसाचे बाजारभाव आजही दबावातच

Anil Jadhao 

नोव्हेंबर महिन्यात कापूस दरानं ९ हजारांचा टप्पा गाठल्यानंतर चढ उतार राहतील, असा अंदाज होता. पण शेतकऱ्यांची टप्प्याटप्यानं सुरु असलेली विक्री आणि ११ टक्के आयातशुल्क यामुळं दरात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच होती.

देशातील घटलेल्या उत्पादनाचाही आधार दराला मिळत होता. बाजारातील आवक जिथे दोन ते सव्वा दोन लाख गाठीं असायची तिथे केवळ एक लाख गाठींच्या दरम्यान आवक होती.

आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये  दर मिळाला. मात्र बाजारातील कापूस आवक वाढली. आज देशातील बाजारात जवळपास दीड लाख गाठींची आवक झाली. त्याचाही दबाव दरावर असल्याचं सांगितलं जातं.

दोन महिने वाट पहिल्यानंतरही अपेक्षित दर मिळत नाही म्हटल्यावर पैशांची गरज असलेले शेतकरी कापूस विकत आहेत. शेतकऱ्यांची ही गरज सर्वांनाच माहीत होती. त्यामुळंच बाजार दबावात ठेवल्याचं सांगितलं जातं.

सध्या बाजारातील आवक वाढली. पण आवक जास्त वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो, असंही सांगितलं जातंय. त्यामुळं बाजारात आवकेचा दबाव येणार नाही, याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे.

कापसाचा भाव यंदा ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असा अंदाज आहे. हा अंदाज अभ्यासकांनी उत्पादन, आयात, निर्यात, वापर अर्थात मागणी आणि पुरवठा विचारात घेऊन व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी क्लिक करा