Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री रोखली

यंदा गुजरात आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादन वाढल्याचाही अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला. गुजरातमध्ये मागील हंगामात ७६ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते.

Team Agrowon

पुणे ः देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज (Cotton Production Estimate) कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Cotton Association Of India) (सीएआय) १० लाख गाठींनी कमी केला. यंदा उत्पादन ३३० लाख गाठींवरच स्थिरावेल; मात्र देशातील कापूस उत्पादन (Cotton Production) गेल्या वर्षीपेक्षा जास्तच राहील; मात्र बाजारातील कापूस आवक खूपच कमी आहे. त्यातच महाराष्ट्रातील बाजारात आवक नगण्य आहे, असे ‘सीएआय’ने म्हटलेय.

डिसेंबरच्या अंदाजात ‘सीएआय’ने देशातील कापूस उत्पादन जवळपास ३४० लाख गाठींवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता; मात्र जानेवारीच्या अंदजात उत्पादन ३३० लाख ५० हजार गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

‘सीएआय’च्या मते, यंदा पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांतील कापूस उत्पादन ८ लाख गाठींनी कमी होण्याचा अंदाज आहे. पंजाब आणि हरियानात अनेक भागांमध्ये यंदा अतिपावसाचा पिकाला फटका बसला.

त्यामुळे उत्पादन घटले. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही उत्पादन घटणार आहे. मध्य प्रदेशातील उत्पादन २० लाख गाठींवर स्थिर राहील, असेही ‘सीएआय’चे म्हणणे आहे.

यंदा गुजरात आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादन वाढल्याचाही अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला. गुजरातमध्ये मागील हंगामात ७६ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते.

ते यंदा ९४ लाख गाठींवर पोहोचेल. तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादन मागील हंगामातील ७५ लाख गाठींवरून ८२ लाख गाठींपर्यंत वाढेल, असा अंदाजही ‘सीएआय’नो व्यक्त केला.

तसेच तेलंगाणामधील कापूस उत्पादन यंदा ९ लाख गाठींनी वाढून ४४ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे.

वापर ३०० लाख गाठींवर स्थिरावेल

‘सीएआय’ने १० लाख गाठींनी कमी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला; मात्र कापूस वापर कायम ठेवला. ‘सीएआय’च्या मते देशात यंदा ३०० लाख गाठी कापसाचा वापर होईल.

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस वापर १८ लाख गाठींनी घटणार आहे. यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६५ लाख गाठींचा वापर झाला, असेही ‘सीएआय’ने म्हटलेय.

महाराष्ट्रातील आवक कमी

कापसाचा हंगाम सुरू होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी झाला. या तीन महिन्यांत देशातील बाजारात ८० लाख गाठी कापसाची आवक झाली.

पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये १९ लाख गाठी कापूस बाजारात आला.

तर गुजरातमधील शेतकऱ्यांनी २४ लाख गाठींची विक्री केली; मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केवळ ११ लाख गाठी कापूस विकल्याचे ‘सीएआय’चे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?; खर्गेंचा सरकारला सवाल

India US Trade: अमेरिकन आयातशुल्काचा मागील चार महिन्यात महाराष्ट्राला फटका; कृषी निर्यातीत २६.६% घट

MGNREGA Workers Protest: मनरेगा कर्मचारी आंदोलनात; ग्रामीण भागात कामे ठप्प

Monkey Crop Damage: आजऱ्यात माकडांचा वाढला उपद्रव

Rose Harvesting: व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाची काढणी आणि व्यवस्थापनाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT