Team Agrowon
केंद्र सरकारचे कापसा विषयीचे धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे.
शेतकऱ्यांना उत्तम भाव मिळत असताना ऑस्ट्रेलियातून भरमसाठ कापूस आयात करण्याची परवानगी दिली.
ऑस्ट्रेलियन कापसाच्या दर्जाचा कापूस आपल्या मातीत तयार होत असताना परदेशातून तो आणण्यात कोणाचे स्वारस्य आहे? अशी भूमिका विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडली.
कापसाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा. पीकविमा, भारनियमन बंदी, १२ तास विद्युत पुरवठा,पीक कर्ज पुनर्गठन, कर्जमाफीचा आदी प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यवतमाळ तर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
त्यानंतर त्यांनी ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो- २०२३. मराठवाडा असोसिशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर (मसिआ) यांच्या वतीने ऑरीक सिटी शेंद्रा डीएमआयसी संभाजीनगर येथे आयोजित एक्स्पोला भेट दिली.
या एक्सपोच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर मांडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन मिळत असते. अशी प्रतिक्रियाही दानवे यांनी दिली.