Cotton Price
Cotton Price  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापसाच्या भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम ॲग्रोवन

भगवान भुतेकर

रामनगर : यंदाही परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा खरीप हंगाम (Kharif Season) वाया गेल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेले आहेत. कापूस (Cotton) हे शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. दरम्यान याच पांढऱ्या सोन्याला सध्या बाजारात कवडीमोल भाव (Cotton Rate) मिळत आहे. जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिणामी भाव वाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडून घरात कापूस साठवून ठेवला जात असल्याचे दिसून येत आहे.

रामनगर व परिसरात खडकाळ माळरानाची जमीन अधिक असल्याने सोमनाथ, जळगाव, ब्राह्मणखेडा, बाजी उमरद, वानडगाव, सावरगाव, हडप, भिलपुरी, मौजपुरी, उटवद, डुकरी पिंपरी, सौलगव्हाण, घोडेगाव, धांडेगाव, नसडगाव, हिवरा रोशनगाव, विरेगाव, चितळी पुतळी, हस्ते पिंपळगाव, हिवर्डी या गावात इतर पिकांच्या तुलनेत कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असते. मागील दोन ते तीन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे.

यावर्षी तर दसरा-दिवाळी दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावला गेला. यामध्ये सोयाबीन, तूर, मका, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मागील तीन वर्षांपासून परिसरात कपाशीचे उत्पादन घटत आहे. परिणामी लागवड खर्च मात्र वाढत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

परतीच्या पावसाने नुकसान होऊन कसाबसा हाती आलेला कापूस सध्या शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत घरात तसाच साठवून ठेवत आहेत. उसने घेतलेले पैसे चुकते करणे, घरखर्चासह इतर आवश्यक बाबींसाठी पैसे लागत असल्याने अनेक शेतकरी नाईलाजाने बाजारात कापुस विक्रीसाठी आणत आहेत. मात्र सध्या हाती आलेल्या कपाशीला बाजारात ७ हजार २०० ते ८ हजार एवढा कवडीमोल भाव देण्यात येत आहे.

दिवाळीनंतर भाव वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र नव्या वर्षातील जानेवारी महिनाही सुरू झाला तरी कापसाच्या भावात सतत घसरण कायम आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कुटुंबातील लहान मोठे आजारपण, मुलांचे शिक्षण, वाढती महागाई, लग्न आदींमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेले आहेत. परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT