Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : शेतकरी होत आहेत बाजारसाक्षर

Agriculture Market Update : बाजारात शेतकऱ्यांची होणारी पिळवणुक आणि भावात होणारे चढ-उतार यामुळे शेतकरी जेरीस येतात.

अनिल जाधव

Agrowon Market Update : शेतकरी निसर्गाशी दोन हात करून शेती पिकवतो. शेतीवर सध्या केवळ निसर्गाचंच संकट नाही, तर सरकारची धोरणं, भू-राजकीय अस्थिरतेतून निर्माण झालेली अनिश्चितता आणि बाजारात होणारी लूट या सर्व संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. एवढ्या सगळ्या दिव्यातून पीक हाती आलं तरी भावाची चिंता असते. बाजारात शेतकऱ्यांची होणारी पिळवणुक आणि भावात होणारे चढ-उतार यामुळे शेतकरी जेरीस येतात.

पण ॲग्रोवन मागील पाच वर्षांपासून शेतीमालाचे बाजारभाव, भावातील चढ-उतार, सरकारी धोरणे आणि त्याचा बाजारावरील परिणाम, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि त्याचा देशातील बाजारावर उमटणारे पडसाद, मागणी-पुरवठ्याचे गणित यासंबंधीचे विश्लेषण (मार्केट इन्टेलिजन्स) सातत्याने देत आहे.

ॲग्रोवन वृत्तपत्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या (यूट्यूब चॅनेल, फेसबुक, व्हॉट्सॲप, मोबाईल ॲप) माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवली जात आहे. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांसाठी बाजारभाव अत्यंत महत्वाचा विषय आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालाला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचा गाडा व्यवस्थित सुरु राहतो.

पण बदलत्या वातावरणामुळे एकीकडे शेती बेभरवशाची झाली, तर दुसरीकडे शेतीमाल बाजारावरही बदलते वातावरण, उत्पादनातील चढ उतार, सरकारची धोरणे, देशादेशांमधील तणाव आणि व्यापारी युध्द, बाजारातील अफवा, नफेखोरी यामुळे शेतीमाल बाजारात पराकोटीची अनिश्चितता मागील काही वर्षांपासून वाढली आहे.

शेती निविष्ठा, मजुरी आणि यंत्र-अवजारांचे भाव वाढल्याने शेतीमालाचा उत्पादन खर्च अव्वाच्या सव्वा वाढला; पण त्या प्रमाणात भावात वाढ मिळाली नाही. काही तात्कालिक घटनांमुळे भाव वाढतात; परंतु ही वाढ कायमस्वरुपी टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांना या सर्व घटकांचा बाजारावर काय परिणाम होतो आणि बाजारभाव काय राहू शकतात, ही माहिती हवी असते. नेमकं तेच काम ॲग्रोवन करत आहे.

बाजारभावावर परिणाम करणाऱ्या घटकांमुळे व्यापाऱ्यांना होणारे नुकसान कसे कमी करावे किंवा टाळावे यासाठी सल्ला देणाऱ्या, अनेक संस्था किंवा जाणकार व्यक्ती आहेत. पण शेतकऱ्यांसाठी अशी कोणतीही यंत्रणा नव्हती, असे जालना जिल्ह्यातील उमरी येथील तरूण शेतकरी बळीराम गाडेकर यांनी सांगितले. बळीराम गाडेकर यांच्याकडे १० एकरी शेती आहे. ते आपल्या क्षेत्रात कापूस, सोयाबीन आणि तूर ही मुख्य पीकं घेतात.

बाजाराची माहिती असल्याशिवाय शेती पिकवणं अवघड आहे, असे ते सांगतात. त्यांना केवळ स्वतःच बाजाराचा अभ्यास सुरु केला नाही, तर आपल्या गावातील इतरही शेतकऱ्यांना बाजाराची माहिती कशी मिळेल, यासाठी ते प्रयत्न करत असतात. गावातील इतर तरुण आणि सुशिक्षित शेतकऱ्यांसोबत ते बाजारभावाविषयीच्या बातम्या, व्हिडिओ यांच्यावर चर्चा करत असतात. सर्व माध्यमांमध्ये ॲग्रोवनची विश्‍वासार्हता जास्त असल्याचे गाडेकर सांगतात.

गाडेकर म्हणाले, ‘‘व्यापारी, गुंतवणुकदार, स्टाॅकिस्ट यांच्याकडून खरेदी आणि विक्री सुरुच असते. एखादा सौदा फसला तरी पुढच्या सौद्यात किंवा लाॅटमध्ये ते आपले नुकसान भरून काढू शकतात. पण आमचा कोणताही शेतीमाल वर्षातून एकदाच हाती येतो.

कापूस, सोयाबीन, तूर ही पिकं एकदाच घेऊ शकतो. एकदा विकला की थेट पुढच्या हंगामात पीक हाती येणार. म्हणजेच आम्हाला व्यापारी आणि स्टाॅकिस्टप्रमाणे नुकसान भरून काढण्याचा पर्याय नसतो. शेतीमाल विकण्याची संधी एकच असते. त्यामुळे नफा की नुकसान हे एकाच विक्रीतून ठरते.

ही विक्री फसली की हळहळ व्यक्त केल्याशिवाय पर्याय नाही. त्यातच शेतकऱ्यांना मार्केट इन्टेलिजन्सची माहिती देणारी विश्‍वासू व्यक्ती किंवा संस्था नव्हती. पण ॲग्रोवनने शेतकऱ्यांची ही गरज पूर्ण केली. ही बाजारभावाची माहिती मिळायला लागली आणि आमचा शेतीमाल विक्रीतला आत्मविश्‍वास वाढला.

व्यापारी आम्हाला आता पहिल्यासारख थापा मारून कमी भावात आमचा माल खरेदी करू शकत नाहीत. ॲग्रोवन मागील १८ वर्षांपासून आम्हाला कसं पिकवायचं हे सांगत आलं आहे, आता त्याच्या जोडीला कसं विकावं याचीही माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे शेतीच्या बांधापासून बाजारातल्या विक्रीपर्यंत ॲग्रोवन शेतकऱ्यांया सोबत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT