मार्केट इन्टेलिजन्स

Soybean : सोयाबीन, कापूस, हळदीत उतरता कल

डॉ. अरुण कुलकर्णी

सध्या सर्वच पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. फक्त टोमॅटोची (Tomato Arrival) आवक वाढत आहे. कर्नाटकमध्ये आवक सर्वाधिक आहे (४० टक्के). त्याखालोखाल महाराष्ट्र (१० टक्के), उत्तर प्रदेश (९ टक्के) व तेलंगणा (८ टक्के) या राज्यातून आवक आहे.

जुलै महिन्यात मका, मूग (Green Gram) व तूर (Tur) यांच्या किमती वाढत होत्या. कापूस (Cotton), हरभरा Chana), हळद (Turmeric), सोयाबीन (soybean), कांदा व टोमॅटो यांच्या किमतींत कल उतरता होता. १ ऑगस्ट पासून NCDEX मध्ये मका व हळदीचे २० डिसेंबर २०२२ डिलिव्हरीचे व MCX मध्ये कापसाचे ३१ जानेवारी २०२३ डिलिवरीचे व्यवहार सुरु झालेले आहेत.

८ ऑगस्टपासून MCX मध्ये कापसाच्या ३१ ऑगस्ट २०२२ डिलिव्हरी व्यवहारांवरील मार्जिन ६ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर वाढवलेले आहे. त्याचबरोबर या व्यवहारांतील किमतींची मर्यादा २ टक्क्यांवर उतरवली आहे. हे बदल कापसाच्या पुढील डिलिव्हरी व्यवहारांसाठी नाहीत. (३१ ऑगस्ट नंतर MCX मधील पुढील करार ३१ ऑक्टोबर, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर व ३१ डिलिव्हरीसाठी आहेत).

या सप्ताहातील किमतीतील चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जुलै महिन्यात घसरत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ३.९ टक्क्यांनी वाढून रु. ४४,८४० वर आले आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भावसुद्धा ४.८ टक्क्यांनी वाढून रू. ३८,५२० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) रू. १,६०० वर आले आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० जाहीर झाले आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती २.२ टक्क्यांनी वाढून रु. २,३५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिवरी) किमतीसुद्धा २.१ टक्क्यांनी वाढून रु. २,३६६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,३२८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ७,६९३ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती ४.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,४७४ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने वाढून रु. ४,७७५ वर आल्या. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात २ टक्क्यांनी वाढून रु. ६,४०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ७,७५५ आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. मुगाची आवक आता कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) जुलै महिन्यात उतरत होती. या सप्ताहात ती १.४ टक्क्याने घसरून रु. ६,३५९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) जुलै महिन्यात वाढत होती. तुरीची किंमत या सप्ताहात ६.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,५४९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२८३ होती; या सप्ताहात ती १.९ टक्क्याने घसरून रु. १,२५८ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती परत घसरू लागल्या आहेत. टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) या सप्ताह अखेर १,१०० रु.पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक जून व जुलै महिन्यात वाढती राहिली.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT