Fish Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Market : सिंधुदुर्गात मासळीच्या दरात घसरण

Fish Rate : कोकणात साधारणपणे १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होत असली ,तरी खऱ्या अर्थाने मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला सुरुवात करतात.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यात श्रावणामुळे मासळीच्या दरात घसरण झाली आहे. सुरमई प्रतिकिलो ८५० रुपये, तर पापलेट प्रतिकिलो ६०० रुपयांना उपलब्ध होत आहे. याशिवाय इतर मासळीचे दर देखील घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोकणात साधारणपणे १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होत असली ,तरी खऱ्या अर्थाने मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला सुरुवात करतात. सिंधुदुर्गात मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असून, मासळी मिळण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. परंतु सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे कोकणात मासे खवय्यांची संख्या तुलनेत कमी असते.

बहुतांशी लोक गणेश चतुर्थीनंतर मासे खातात. त्यामुळे सध्या मासळीला अपेक्षित आवक नसल्यामुळे मासळीच्या दरात घसरण झाली आहे. जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांत मालवण, वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग येथून अधिकतर मासळी विक्रीकरिता येते.

सध्या सुरमईला प्रतिकिलो ८५० रुपये, बांगडा प्रतिकिलो २५० रुपये, सौंदळा प्रतिकिलो २६० रुपये, पापलेट प्रतिकिलो ६०० ते ७०० रुपये, सरंगा प्रतिकिलो ६०० रुपये, मोरी प्रतिकिलो ५०० रुपये, पेडवे प्रतिकिलो ५० रुपये, लहान कोळंबी प्रतिकिलो ३०० रुपये, मोठी कोळंबी प्रतिकिलो ५०० रुपये, याशिवाय मांदेली आणि इतर मासळीचे दर सध्या कमी आहेत.

प्रत्येक मासळीत दोनशे ते तीनशे रुपयांनी घट झालेली दिसून येत आहे. दरम्यान, हे दर श्रावण संपेपर्यंत कायम राहतील असा अंदाज आहे

मासळीचे दर प्रतिकिलोमध्ये (रुपयांमध्ये)

सुरमई - ८५०, बांगडा - २५०, सौंदळा - २६०, पापलेट - ६०० ते ७००, सरंगा - ६००, मोरी - ५००, पेडवे - ५०, लहान कोळंबी - ३००, मोठी कोळंबी - ५००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्याला पहिले प्राधान्य

Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?

Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?

Weekly Weather: हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT