Pune News : आषाढ महिन्यातील शेवटचा दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येनिमित्त मटण, मासळी आणि चिकनला मोठी मागणी वाढली होती. पुणे शहर आणि परिसरातून मोठ्या मागणीमुळे दरामध्ये देखील वाढ झाली होती.
श्रावण महिन्याला सोमवार (ता. ५) पासून प्रारंभ होत आहे. श्रावणात अनेकजण मांसाहार करत नसल्याने आषाढ अमावस्येच्या दिवशी मांसाहार करण्याची परंपरा आहे. याचदिवशी रविवार असल्याने मटण मासळीला मोठी मागणी वाढली होती.
तर श्रावण महिना संपला तरी नवरात्रोत्सवानंतर म्हणजेच दसऱ्यानंतर मांसाहार सुरू करतात. पुढील अडीच महिने मांहार होणार नसल्याने खवय्यांची रविवारी (ता. ४) मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी सकाळपासून रांगा लावून खरेदी केली.
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. पापलेट, सुरमईसह ओले बोंबील, कोळंबी, हलवा या मासळींना चांगली मागणी होती. पापलेट, सुरमईचे दर तेजीत होते.
मासळी बाजारात रविवारी (ता. ४) खोल समुद्रातील मासळी, खाडीतील मासळी, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळी तसेच नदीतील मासळीची आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. हॉटेल व्यावसायिकाकडून चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली, असे पुणे शहर बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.
रविवारी (ता. ४) पहाटेपासूनच दिवसभर मुसळधार पावसामुळे सकाळी बाजारात खरेदीसाठी कमी झाली. दुपारनंतर पाऊस कमी झाला. त्यानंतर बाजारात मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी गर्दी झाली होती.
मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर
मटण- ७४० रुपये
चिकन- २६० रुपये
पापलेट- १००० ते १५०० रुपये
सुरमई- ९०० ते १००० रुपये
कोळंबी- ३०० ते ५०० रुपये
ओले बोंबील- ३०० ते ४०० रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.