Fish Market Electricity : सावनेरच्या नव्या मासळी बाजाराला आठवडाभरात वीज

Electricity Update : मासळी बाजारात सावनेरच्या नगरपरिषदेने वीज पुरविण्यासाठी एका आठवड्यामध्ये ट्रान्सफॉर्मर लावण्यात येणार असल्याची शाश्वती उच्च न्यायालयाला दिली आहे.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : सावनेर येथील खुल्या मैदानावरील मध्यभागी अवैधरीत्या चालविण्यात येणारे मासळी बाजार गावाबाहेर कोलार नदी किनाऱ्यावर हलविण्यात आला आहे. या बाजारात सावनेरच्या नगरपरिषदेने वीज पुरविण्यासाठी एका आठवड्यामध्ये ट्रान्सफॉर्मर लावण्यात येणार असल्याची शाश्वती उच्च न्यायालयाला दिली असून महावितरण विभागाशी तसा संपर्क करण्यात येईल, असे नमूद केले. न्यायालयाने नगरपरिषदेला या संपूर्ण प्रक्रियेसाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला.

या अवैध मासळी बाजाराच्या विरोधात कमलकुमार भारद्वाज आणि इतर चार जणांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, सावनेरमध्ये जुना धान्य गंज, दुर्गा माता मंदिराच्या समोरील खुल्या मैदानावर हे मासळी बाजार अवैधरीत्या सुरू आहे.

Electricity
Agriculture Electricity : शेतीला दिवसा विजेसाठी सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प

यामुळे, परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मासळी बाजारातून येणारी दुर्गंधी आणि मासळ्यांची निरुपयोगी अवयवांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खुल्या मैदानावर पूर्वी ठोक धान्य बाजार होते. मात्र, २००८ मध्ये धान्य बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हटविण्यात आले.

त्यामुळे या खुल्या मैदानावर अवैधरीत्या मासळी बाजार सुरू झाला, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. नागरिकांकडून वारंवार प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे सावनेरच्या नगर परिषदेने ४ मार्च २०१७ रोजी बैठकीमध्ये हा मासळी बाजार कोलार नदीच्या परिसरात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवीन मासळी बाजार बांधण्यासाठी सव्वा दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले.

Electricity
Free Electricity Scheme : मोफत वीज योजनेस मान्यता

२०१९ मध्ये बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु, पाणी, सांडपाणी प्रक्रिया यंत्र (एसटीपी), वीज पुरवठा अशा सुविधा पाच वर्षांपासून अद्यापही पुरविल्या नाही. त्यामुळे, मासळी बाजार अद्यापही हलविण्यात आले नाही. नगर परिषदेपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदन सादर करण्यात आले.

यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने अखेर याचिकाकर्त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. नव्या जागेत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार सांडपाणी प्रक्रिया यंत्र बसविण्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे नगरपरिषदेने नमूद यापूर्वी केले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा व अ‍ॅड. मसूद शरीफ यांनी व सावनेर नगरपरिषदेतर्फे अ‍ॅड. राधिका बजाज यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com