Mango Export
Mango Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Export : अमेरिका, जपानला आंब्याची निर्यात सुरू

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला (Mango Production) आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कृषी हवामान विभागनिहाय निर्यात (Mango Export) सुविधा केंद्रे सुरू केली आहेत.

त्यामधील वाशी (नवी मुंबई) येथील निर्यात सुविधा केंद्रांतून जपान आणि अमेरिकेला हापूस, केशर आणि बैंगणपल्ली आंब्याची पहिली कन्साईटमेंट पाठविण्यात आल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी दिली.

वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रामध्ये विविध देशांसाठीचे विविध निर्यात प्रोटोकॉल तयार करण्यात आले आहेत. यामध्ये उष्णजल आणि विकिरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये विकिरण सुविधा ही भाभा अणुऊर्जा केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उष्णजल सुविधा प्रक्रियेद्वारे ८ एप्रिल रोजी केशर व बैगनपल्ली हा सुमारे १ टन आंबा जपानला निर्यात करण्यात आला. तर ११ एप्रिल रोजी साडेसहा टन हापूस, केशर व बैगनपल्लीची पहिली कन्साईनमेंट अमेरिका येथे निर्यात करण्यात आली.

जपान, न्युझीलंड, दक्षिण कोरिया, युरोपीयन देश तसेच रशिया या आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. याद्वारे फळमाशी (फ्रूट फ्लायचा) चा होणारा प्रादुर्भाव नष्ट केला जातो.

तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटिना या आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यामधील कोयकिडा व कीटकांचे निर्मूलन करण्याकरिता विकिरण प्रक्रिया केली जाते. या सुविधेवर कोबाल्ट-६० किरणांचा विकीरणासाठी वापर केला जातो.

विकिरण प्रक्रिया उष्णता व रसायनविरहीत असल्याने अन्नपदार्थांच्या मूळ गुणधर्मामध्ये कोणतेही बदल होत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

अमेरिकेच्या आंब्याची पहिली कन्साईनमेंट पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रवाना झाली.

या वेळी अमेरिकेचे निरीक्षक एलीफ्रिडो मारिन (फ्रेडी), ‘एनपीपीओ’चे प्लॅंट प्रोटेक्शन ऑफिसर डॉ. वेंकट रेड्डी, अपेडाच्या श्रीमती प्रणिता चौरे व निर्यातदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लवकरच समुद्रमार्गे अमेरिकेला निर्यात

गेल्यावर्षी अमेरिकेला समुद्रामार्गे आंबा निर्यात यशस्वीपणे प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली होती. यामुळे या हंगामात (२०२३) देखील व्यावसायिकदृष्ट्या आंबा निर्यात समुद्रमार्गे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पणन मंडळाच्या आंबाविषयक सर्व सुविधा संगणक प्रणालीद्वारे मॅगोनेटमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांसमवेत व पॅकहाऊससमवेत लिंकिंग झालेल्या आहेत. यामुळे आयातदारास आंब्याच्या गुणवत्तेबाबत खात्री मिळत असून निर्यातवृद्धीस मदत होत आहे.

या कन्साईनमेंटकरिता ‘अपेडा’, ‘एनपीपीओ’च्या सहकार्याने कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT