Mango Damage : आंबा नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आश्‍वासन

आंबा बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊ शासनपातळीवर बागायतदारांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले आहे.
Hapus Mango Crop Damage
Hapus Mango Crop Damage Agrowon

Ratnagiri News : कडाक्याचा उष्मा, वादळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा विचित्र परिस्थितीचा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. यंदा उत्पादनात मोठी घट असून आंबा बागायतींचे कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभागाकडून सर्वेक्षण करा, अशी मागणी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग यांच्याकडे आंबा बागायतदारांनी केली.

त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित यंत्रणेला नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

आंबा बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊ शासनपातळीवर बागायतदारांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले आहे.

जिल्हाधिकाखऱ्यांच्या भेटीप्रसंगी सुनील नावले, प्रकाश साळवी, श्री. पेडणेकर यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.

Hapus Mango Crop Damage
Mango Business : आंबा व्यवसायातून मिळविली आर्थिक स्थिरता

यंदा जिल्ह्यात आंबा पिकाला हवामानातील होणाऱ्या बदलाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरुवात होत असतो. यावर्षी सुरुवातीपासून पिकाला अनुकूल हवामान तयार झालेले नाही.

कधी कडक उन्हाळा, तर कधी ढगाळ वातावरण अशा प्रकारच्या हवामानामुळे तुडतुडा मोठ्या प्रमाणात आहे. डिसेंबरमध्ये थंडीऐवजी उष्ण हवामान राहिल्यामुळे झाडांना मोहोराऐवजी पालवी आली. जानेवारीत झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली.

पण खराब हवामानामुळे अपेक्षेप्रमाणे फलधारणा झाली नाही. पीक वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या बागायतदरांना कराव्या लागल्या.

शेवटच्या टप्यातील मोहोर करपून वाया गेला. या हंगामात जिल्ह्यात हापूसचे पीक अंदाजे २० ते २५ टक्केच हाती येईल, असा अंदाज आहे.

या हंगामात येणाऱ्या एकूण आंबा पिकाचे सर्वेक्षण सक्षम यंत्रणेकडून म्हणजेच कृषी विद्यापीठ, जिल्हा कृषी अधिकारी, महसूल यंत्रणा यांनी करून घ्यावी आणि त्याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठवावा अशी विनंती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.

फुलकिडीवर अभ्यास करा

या हंगामात आंबा पिकाचे फुलकिड (थ्रिप्स) या रोगाने नुकसान केले आहे. या रोगावर औषध उपलब्ध नाही. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी संशोधन केंद्र आहेत, त्यांच्यामार्फत फुलकिडीवर प्रभावी कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास झाला तरच शेतकऱ्याला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांनी जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.

आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले असून नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यांनीही संबंधित यंत्रणेला सूचना करू असे आश्‍वासन दिले आहे.
प्रकाश साळवी, आंबा बागयातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com