Team Agrowon
आपल्या विशिष्ठ चवीसाठी हापूस आंबा प्रसिध्द आहे. त्यामुळेच आंब्याला फळांचा राजा असंही म्हटले जाते.
सध्या बाजारात आंब्याचे दर तेजीत आहेत. त्यामुळे आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्यां सामान्यांसाठी हापूस आंब्याची चव अजून तरी आवाक्याबाहेरच आहे.
आता सामान्यांनाही हापूसची चव चाखायला मिळणार आहे. पुण्यात आता मासिक हप्त्यावर (इएमआय) (EMI) आंब्याची पेटी घेता येणार आहे
पुण्यातील गौरव सणस या व्यावसायिकाने ग्राहकांसाठी चक्क इएमआयवर आंबा उपलब्ध करून दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गौरव हे पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. गुरूकृपा ट्रेडर्स अॅण्ड फ्रुट प्रॉडक्ट या आपल्या फळे विक्रीच्या दुकानात यंदा त्यांनी इएमआयवर आंबे विकण्याची अभिनव कल्पना राबविली आहे.
अशाप्रकारे आंबे विक्रीचा हा भारतातील पहिलाचा प्रयोग असल्याचा दावाही गौरव यांनी केला आहे.
यासाठी ग्राहकाला कमीत कमी पाच हजार रुपये किमतींच्या आंब्यांची खरेदी करणे आवश्यक आहे.