Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : खानदेशातून यंदा केळीची दोन हजार कंटेनर निर्यात शक्य

Banana Market : खानदेशातून यंदा विविध देशांत सुमारे दोन हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात होईल, असा अंदाज आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातून यंदा विविध देशांत सुमारे दोन हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात होईल, असा अंदाज आहे. निर्यातीसाठी केळी उपलब्ध होत असून, रोज सहा ते सात कंटेनर केळी आखातात पाठविली जात आहेत.

निर्यातीच्या केळीचे दर खानदेशात कमाल २००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. किमान दर १८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. थंडीचा कालावधी कमी झाल्याने निर्यातीसंबंधी केळी उपलब्ध होऊ लागली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून सध्या रोज चार कंटेनर केळीची निर्यात होत आहे. जळगाव जिल्ह्यात फक्त रावेर, मुक्ताईनगर, चोपडा व यावल या भागात केळी उपलब्ध होत असून, या भागातून रोज तीन कंटेनर केळीची निर्यात सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही निर्यातक्षम केळी उपलब्ध झाली आहे. थंडी व विषम स्थितीतही शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करून गुणवत्तापूर्ण, दर्जेदार केळी बाग साधली आहे.

खानदेशातून २०१८ पासून केळीची निर्यात बऱ्यापैकी होत आहे. सुरुवातीला चार-पाच कंटेनर केळीची निर्यात झाली होती. पुढे ही निर्यात वाढत गेली. कोविड काळातही सुमारे ५०० कंटेनर केळीची आखातात निर्यात झाली होती. मागील वर्षी १५०० कंटेनर केळीची निर्यात झाली होती.

यंदा त्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. कारण दर्जेदार, निर्यातक्षम केळी बागा खानदेशात अधिक आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहाद्यातील ब्राह्मणपुरी, सुलवाडा, सुलतानपूर, जवखेडा, तळोद्यातील अनेक गावांत निर्यातीची केळी अधिकची उपलब्ध आहे. जळगाव जिल्ह्यात रावेरातील तापीकाठी निर्यातीची केळी उपलब्ध आहे, अशी माहिती मिळाली.

आंध्र प्रदेशातील कंपन्या खानदेशात येण्याच्या तयारीत

आंध्र प्रदेशात तापमान वाढत आहे. तेथे पुढे केळीची टिकणक्षमता कमी होईल. यामुळे विविध खरेदीदार कंपन्या खानदेशात येतील. पुढे खानदेशात निर्यातीच्या केळीची उपलब्धताही अधिक होईल. सध्या राज्यात सोलापुरातून केळीची गतीने निर्यात सुरू आहे.

सोलापुरात निर्यातीच्या केळीला सर्वाधिक २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तेथून रोज १५ ते १८ कंटेनर केळी आखातात पाठविली जात आहेत. विषम वातावरणामुळे काही बागांत केळी पक्व होण्याची गतीही कमी राहिली आहे. याचाही परिणाम निर्यातीवर झाल्याचे बाजारपेठेचे जाणकार प्रेमानंद महाजन (तांदलवाडी, जि. जळगाव) यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT