Team Agrowon
खानदेशात केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांपासून स्थिर आहे.
दर्जेदार केळीचे दरही दोन हजार रुपयांवर टिकून आहेत. आवक मागील १२ ते १३ दिवसांत प्रतिदिन चार ट्रकने (एक ट्रक १६ टन क्षमता) वाढली आहे.
निर्यातक्षम केळी खानदेशात या महिन्यात काढणीवर आली आहे.
कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली असून, आता मृग बहरातील केळीची आवक सुरू आहे.
तसेच पिलबाग केळीमधूनही दर्जेदार केळी काढणीवर आली आहेत.
मागील महिन्यात खानदेशात प्रतिदिन सरासरी ३० ट्रक केळीची आवक होत होती.