Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस उत्पादकांची दरवाढीची अपेक्षा अजूनही अपूर्णच

यंदा कधी नव्हे तो कापूस बाजार दबावात आहे. दर वाढतील या अपेक्षेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवलेली आहे.

Team Agrowon

Cotton Market Update Akola : यंदा कधी नव्हे तो कापूस बाजार (Cotton Market) दबावात आहे. दर वाढतील या अपेक्षेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवलेली आहे. कुठल्याच बाजारात या हंगामात भरघोस आवक (Cotton Arrival) झालेली नाही.

दुसरीकडे दरही वाढत (Cotton Rate) नसल्याने कापूस विक्रीची चिंतासुद्धा शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कमी दरामुळे प्रक्रिया उद्योगजगत सध्या आनंदी दिसत असला तरी याचा फटका पुढील हंगामात कपाशी लागवडीला बसण्याची चिन्हे आहेत, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षांत कापसाला बऱ्यापैकी दर मिळाल्याने या पिकाची पुन्हा लागवड वाढू लागली होती. सोयाबीनसह इतर पिकांचे क्षेत्र कमी करून कपाशीची लागवड वाढत चालली होती.

बाजारात १० हजारांवर पोहोचलेल्या दरांमुळे उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, या हंगामात हा दर मिळालेला नाही. सध्या कापूस अवघा साडेसात हजारांपासून ८३०० पर्यंत विकत घेतला जात आहे.

खेडा खरेदीचा दर याहीपेक्षा कमी झालेला आहे. या भागात अकोट ही कापसाची एक प्रमुख बाजारपेठ तयार झालेली आहे. तेथे कापसाचा सध्याचा दर ७८०० ते ८३०० पर्यंत मिळत आहे. आवक मात्र अत्यल्प आहे.

बहुसंख्य मोठ्या कापूस उत्पादकांनी अद्यापही बऱ्याच कापसाची विक्री रोखून धरलेली आहे. शेतकरी सध्याच्या दरात सुधारणा होईल, या आशेने थांबलेले आहेत.

कापूस प्रक्रिया करणारे उद्योगजगत कमी दरांमुळे समाधानी आहे. परंतु याचा दुसऱ्या बाजूने विचार केल्यास आगामी हंगामात लागवडीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

कपाशीची लागवड घटल्यास प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल पुन्हा दुसरीकडून उपलब्ध करून घेण्याची वेळ उद्योजकांवर येऊ शकते.

गेल्या काळात असे करावे लागलेले आहे. त्यामुळे कपाशीचे लागवड क्षेत्र घटणे हे या उद्योगासाठीही फायदेशीर ठरणार नाही, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

उत्पादन खर्च भरमसाठ

कापसाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना महाग झालेल्या कृषी निविष्ठा, मशागतीचे दर, मजुरी यामुळे एकरी ३० ते ३५ हजारांपर्यंत खर्च लागतो आहे.

यंदा तब्बल १० ते १२ रुपये प्रतिकिलोने कापसाची वेचाई करावी लागली होती. उत्पन्नाच्या ४० ते ५० टक्के खर्च होत आहे.

शिवाय सतत पाऊस झाल्याने पहिल्या टप्प्यात निघणाऱ्या कापसाचे उत्पादन घटले. यामुळे यंदा किमान १२ हजारांपर्यंत कापसाला दर मिळेल, असा अंदाज शेतकरी सुरुवातीपासून व्यक्त करीत होते. परंतु हे सर्व विरुद्ध घडले आहे.

कापसाचा दर १० हजारांपर्यंतही मिळणे कठीण होऊन बसल्याने यंदा उत्पादक अडचणीत आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT