Turmeric Seed  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Seed : सांगलीत वाढली हळद बियाण्यांची मागणी

Turmeric Market : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद बियाणे विक्रीस आले आहे. यंदा हळदीला चांगले दर असल्याने हळद बियाण्याची मागणी वाढली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद बियाणे विक्रीस आले आहे. यंदा हळदीला चांगले दर असल्याने हळद बियाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे हळद बियाण्याच्या दरातही वाढ झाली असून असून आत्तापर्यंत १५० टन बियाण्याची विक्री झाली आहे.

हळद बियाण्याला प्रतिक्विंटल ६५०० ते ७००० रुपये असा दर आहे. गतवर्षी हळदीच्या क्षेत्रात घट झाल्याने त्याचा परिणाम बियाणे उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे यंदा बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी हळद बियाणे विक्रीस येते. अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीस प्रारंभ होतो. त्यामुळे यंदा बाजार समितीत हळद बियाणे विक्रीस आले आहे. बाजार समितीत सध्या ३० ते ४० गाडी म्हणजे ४५० ते ६०० टन तमिळनाडू येथून सेलम वाणाचे हळदीचे बियाणे विक्रीस दाखल झाले आहे.

बियाणे खरेदी करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेडसह कर्नाटकातील शेतकरी येतात. सध्या १० गाडी म्हणजे १५० टन बियाण्याची विक्री झाली आहे. देशात गतवर्षी कमी पावसाचा फटका हळद लागवडीला बसल्याने क्षेत्र घटले होते. परिणामी हळदीच्या उत्पादनाबरोबर बियाणे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

पाणीटंचाईमुळे लागवड थांबली

गतवर्षी बियाण्याला प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर होता. हळदीला चांगले दर मिळत असल्याने यंदाच्या हंगामात शेतकरी हळद लागवड करण्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात हळद बियाण्याच्या दरात २००० ते २५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी लागवडीसाठी थांबला आहे. पाऊस झाल्यानंतरच लागवड केली जाईल. यंदा बियाण्याला मागणी चांगली असल्याने उठावही चांगला होत आहे.

हळदीला दर चांगले असल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी येत आहेत. यंदा बियाण्यांची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने बियाण्याच्या दरातही वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
- कलंदर मकानदार, हळद बियाणे विक्रेते, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT