Ginger Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आले पिकाच्या दरात घट

Ginger Market : सातारा जिल्ह्यातील खोडवा आले पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून मागील माहिन्यापासून आले पिकाच्या दरात घट सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील खोडवा आले पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून मागील माहिन्यापासून आले पिकाच्या दरात घट सुरू आहे. सध्या जुन्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) ३२ ते ३४ हजार रुपये दर मिळत आहे. आल्याच्या दरात प्रतिगाडी चार ते पाच हजार रुपये घट झाली आहे.

जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने आले काढणीवर परिणाम झाला आहे. आल्यात पाणी साचत असल्याने मूळकुज, कंदकुजमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आले. एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर पिकांवरील मूळकुज झाली आहे. आले पीक टिकवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात असल्याने खर्चात वाढ होत आहे.

आले खरेदी प्रतवारी करून सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रतवारी केलेल्या आल्‍यास प्रतिगाडी ३२ ते ३४ हजार रुपये तसेच नवीन आल्यास प्रतिगाडी नऊ ते ११ हजार रुपये दर मिळत आहे. जुलैच्या तुलनेत आल्याच्या दरात चार ते पाच हजार रुपये घट झाली आहे. नवीन आल्याचे दर स्थिर आहेत.

जोरदार पावसामुळे आले पीक काढण्यास अडचणी येत आहेत. नद्यांनी पाणी असल्याने आले धुणीस अडचण येत आहे. अतिपाऊस व अचानक वाढणारी उष्णता यामुळे आल्यास कंदकुज व मूळकुजचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. नवीन लागवडीच्या तुलनेत खोडवा आल्यास मुळकुजीचा जास्त प्रभाव जाणवू लागल्याने शेतकऱ्यांकडून आले पीक काढणीस प्राधान्य दिले जात आहे.

खोडवा आले काढणी अंतिम टप्प्यात

खोडवा आले काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. गणपती उत्सवात चांगले दर मिळण्याची आशा असते. मात्र हा अंदाज शेतकऱ्यांचा चुकलेला आहे. आले दरात सुधारणा होण्याचाऐवजी यंदा घट झाली आहे. खोडवा आले या महिन्यात (सप्टेंबर) काढले जात असल्याने सध्या आले काढणी अंतिम टप्प्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT