मातीमध्ये सर्व आवश्यक अन्नद्रव्ये आहेत. परंतु तिचे भौतिक आणि जैविक गुणधर्म ठीक नसतील, तर असणारी अन्नद्रव्ये काही कामाची नसतात. त्यामुळे सुपीक जमिनीची व्याख्या व्यापक केली पाहिजे. माती सुपोत, सुपीक आणि सजीव असणे म्हणजे ती खऱ्या अर्थाने उत्पादक असणे हे समजून घेतले पाहिजे.How to improve soil fertility naturally in Maharashtra: राष्ट्र ही संकल्पना मानवनिर्मित आहे, तर पृथ्वी सर्वांचीच आहे. हवामान बदल या संकटाला राष्ट्राच्या सीमा असणार नाहीत. त्यामुळे पृथ्वीची सुरक्षितता (पृथ्वीवरील सर्व जिवांची) ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी अशी भूमिका घेऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘यूएनडीपी’ या संस्थेने २०३० पर्यंत साध्य करण्याची १७ ध्येय ठेवली आहेत. ती शाश्वत विकास ध्येय म्हणून ओळखली जातात. जगभरातील अनेक देश या कार्यक्रमात सहभागी आहेत, त्याच प्रमाणे भारत देशानेही हा कार्यक्रम स्वीकारला आहे. .या ध्येय पूर्तीसाठी निती आयोग कार्यरत आहे. त्याला अनुसरून अनेक योजना तयार केल्या जात आहेत. ही ध्येय साध्य करण्यासाठी केवळ आठ वर्षे उरली आहेत. भारत देशाला मोठा पल्ला गाठणे बाकी आहे.आपल्याकडे या ध्येय पूर्तीसाठी अनेक योजना आहेत. परंतु त्यामध्ये समग्र दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. एकूण १७ शाश्वत विकास ध्येयांपैकी सहा ध्येय आणि माती सुपीकता असा परस्पर संबंध समजून घेतला तरी समग्र धोरणाची निकड लक्षात येते..Soil Health: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य .ध्येय २ - भूक निर्मूलन, ध्येय ३ - मानवी स्वास्थ्य, ध्येय ६ - सर्वांना पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता, ध्येय १२ - जबाबदारीने उपभोग आणि उत्पादन, ध्येय १३ - हवामान बदलाच्या बाबतीत कृतिशील राहणे आणि ध्येय १५ - जमिनीवरील जैवविधतेला जोपासणे. ही सहा ध्येय महत्त्वाची आणि त्या सर्वांचा सहसंबंध हा जमिनीशी आहे..सुपीक जमिनीची व्याख्याजगातील शेती क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगण्य संस्था म्हणजे ‘शेती आणि अन्न संस्था’ यांनी एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की जगभरातील लोकांच्या अन्नातील विविधता कमी होत आहे. एकूण उपलब्ध पिकांपैकी केवळ १४ पिके आहारात आहेत. त्यातही मोठा वाटा हा गहू आणि तांदळाचा आहे. दुसऱ्या बाजूला हा अहवाल असेही सांगतो की जी पिके पोषण मूल्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत त्या पिकातील पोषण घटक वेगाने कमी होत आहेत..Soil Health: मृदास्वास्थ्याला हवे सर्वोच्च प्राधान्य.त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे जीवनसत्त्व क - १५ टक्के, ब - १२ - ३८ टक्के, प्रथिने - ६ टक्के, लोह १५ टक्के, कॅल्शिअम - १६ टक्के. अशा पद्धतीने पिकातील पोषण घटक कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीच्या सुपीकतेचा वेगाने होत असलेला ऱ्हास. मातीमध्ये सर्व आवश्यक अन्नद्रव्ये आहेत. परंतु तिचे भौतिक गुणधर्म (जमीन कठीण असणे, पाणथळ असणे) आणि जैविक गुणधर्म (मातीतील जैव विविधता कमी असणे) ठीक नसतील तर असणारी अन्नद्रव्ये काही कामाची नसतात. त्यामुळे सुपीक जमिनीची व्याख्या व्यापक केली पाहिजे..माती सुपोत, सुपीक आणि सजीव असणे म्हणजे ती खऱ्या अर्थाने उत्पादक असणे हे समजून घेतले पाहिजे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जगभरातील शास्त्रज्ञ अशी भूमिका घेत आहेत की माती सुरक्षेतून अन्न आणि पोषण सुरक्षा साध्य होणार आहे. मातीतील बिघाड हा अन्न आणि पोषण सुरक्षेच्या ध्येय पूर्तीतील मोठा अडथळा ठरणार आहे. यादृष्टीने संशोधन आणि त्यावर आधारित धोरण तयार केले जात आहे..Soil Health: सांगलीतील जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्र यांची कमतरता.त्या धोरणाचाच एक भाग म्हणजे एकात्मिक माती व्यवस्थापन, पिकांचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि भूक निर्मूलन असे तीन वेगळी धोरणे आणि त्यावरील अनेक प्रकल्प असा विचार न करता एकात्मिक माती आणि पीक पद्धती आणि त्याद्वारे अन्न आणि पोषण सुरक्षा असा समग्र विचार केला जात आहे. आपल्या कडेही असा विचार सुरू आहे. त्याचे स्वरूप फार छोटे असेल परंतु त्याची उद्दिष्ट्ये फार मोठी आणि परिणामकारक अशी ठरणारी आहेत..त्यापैकी एक संस्था म्हणजे केरळमधील एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशनचा एक संशोधन प्रकल्प! त्या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की जमिनीचे आरोग्य सुधारून पिकांचे पोषण सुधारणे आणि अंतिमतः माणसासाठी सकस अन्न निर्मिती करणे. या एका व्यापक उद्देशासाठी त्यांनी काम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी मातीतील सूक्ष्मजीवांची विविधता वाढविणे आणि त्याद्वारे जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देणे, जमिनीमध्ये झिंक, लोह खूप आहे. परंतु ते पिकांना घेता येत नाही. ते घेणे शक्य होण्यासाठी हवे आहेत जीवाणू..Soil Health: मातीचे आरोग्य सांभाळल्यास समस्या सुटतील.जे जमिनीतील अन्नद्रव्ये पिके शोषू शकतील अशा स्वरूपात तयार करतील. म्हणजेच घरामध्ये धान्याचे कोठार आहे परंतु त्यापासून स्वयंपाक तयार करणारी गृहिणी हजर नसेल तर घरातील लोक उपाशीच राहणार अशी अवस्था जमीन निर्जीव झाल्यामुळे होत असते. आज आपल्या शेतीपुढील हीच फार मोठी समस्या आहे. माती सुरक्षेतून अन्न आणि पोषण सुरक्षा असे मिशन स्वरूपामध्ये काम उभे केले पाहिजे. यावरील संशोधन उपलब्ध आहे. गरज आहे त्याला धोरणात्मक पाठबळ देण्याची!.अन्न, वस्त्र, निवारा, इंधन आणि चारा या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला मातीवर अवलंबून राहावे लागते. जगभरातील माणसाच्या एकूण अन्नाच्या गरजांपैकी ९५ टक्के गरजा या मातीवर अवलंबून आहेत. एवढे मातीचे महत्त्व असूनही जगातील ३३ टक्के मातीचा ऱ्हास (धूप, नापीक बनणे, क्षारपड होणे आदी) होत आहे. त्याला वाढते नागरीकरण आणि त्यामुळे होणारे प्रदूषण, आधुनिक शेतीला आवश्यक निविष्ठा (रासायनिक खते, कीडनाशके, तणनाशके) त्याचा भरमसाठ वापर, आतिवृष्टी, वादळे या सारख्या नैसर्गिक आपत्ती ही मुख्य कारणे आहेत..केवळ मातीच्या ऱ्हासामुळे दरवर्षी ४०० बिलियन डॉलरचे नुकसान होत आहे. मातीची धूप होणे यामुळे ७.६ मिलियन टन तृणधान्याचे नुकसान होत आहे. मातीचा ऱ्हास अशाच पद्धतीने सुरू राहिला तर नजीकच्या काही वर्षांमध्ये अल्प भूधारक शेतकऱ्यांचे उपजीविका साधन हिरावले जाऊन त्यांना बेरोजगारी आणि उपासमार या समस्यांना तोंड द्यावे लागेल. यावर उपाय म्हणजे शाश्वत माती व्यवस्थापन हा आहे. ८८०५२९२०१०(लेखक शाश्वत शेती विकास मिशन, एम.के.सी.एल. नॉलेज फाउंडेशनचे मुख्य सल्लागार आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.