Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar : आंतरराष्ट्रीय बाजारात साखर दरात घसरण

जागतिक मंदीची चर्चा आणि तेलाच्या घसरलेल्या किमती या दोन्ही घटकांचा फटका साखर दराला बसला आहे.

Raj Chougule

कोल्हापूर : जागतिक मंदीची चर्चा आणि तेलाच्या घसरलेल्या किमती (Edible Oil Rate) या दोन्ही घटकांचा फटका साखर दराला (Sugar Rate) बसला आहे. साखर खरेदी- विक्रीसाठी दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरत असल्याने गेल्या सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात साखरे दरात घसरण पाहावयास मिळाली. (Global Sugar Rate)

१८ जुलैला न्यू यॉर्क मार्च २३ वायदे बाजारात (एसबीएच २३) कच्च्या साखरेचा दर (Raw Sugar Rate) १९.५१ पौंड प्रतिसेंट होता एक डॉलर अंदाजे ८० रुपये होता, याचा भारतीय चलनात विचार केला तर १८ जुलै रोजी जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेचा दर अंदाजे ३२००० ते ३३००० रुपये प्रतिटन एक्स मिल होता. परंतु जागतिक बाजारातील कमी होत चाललेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक मंदीच्या भीतीमुळे मागील एक आठवड्यात जागतिक बाजारातील न्यू यॉर्क मार्च २३ वायदे बाजारात (एसबीएच २३) २७ जुलैला कच्च्या साखरेची किंमत १७.५७ पौंड प्रतिसेंट झाली. म्हणजेच मागील एक आठवड्यामध्ये कच्च्या साखरेच्या किमती ९ ते १० टक्के इतक्या कमी झाल्या. भारतीय रुपयांमध्ये विचार करता १८ जुलै ला ३२००० ते ३३००० रुपये प्रतिटन एक्स मिल असणारा कच्च्या साखरेचा दर आज जवळपास २८५०० ते २९५०० प्रतिटन एक्स मिल इतका खाली आला आहे.

जागतिक बाजारातील मंदीची लाट तसेच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारी घसरण आणि हंगाम २०२२-२३ मध्ये जागतिक बाजारात मागणीपेक्षा जादाचे साखर उत्पादन होण्याची असलेली शक्यता यामुळे साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहण्यास मिळत आहेत.

हंगाम २०२२-२३ मध्ये भारतात ३५५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्यामुळे ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन वाढत आहे. जागतिक बाजारातील या घडामोडी भारतीय साखर कारखानदारीस हंगाम २०२२-२३ करता धोक्याची घंटा ठरू शकतात. २०२२-२३ मध्ये ६० ते ७० लाख टन साखर निर्यातीला मागणी राहू शकते, असा जागतिक बाजारपेठेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अंदाज आहे.

१२ लाख टन निर्यातीला लवकरच परवानगी

साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखर निर्यातीबाबत मंत्रिस्तरीय बैठक बुधवारी (ता. २७) झाली. या बैठकीत १२ लाख टन साखरेच्या कोट्याला मंजुरी देण्याचे ठरले आहे. अद्याप या निर्णयाबाबतची माहिती कारखान्यांना देण्यात आलेली नसली तरी साखरेला मंजुरी कधीही मिळू शकते, असे सांगण्यात आले. याबाबत काही दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. हा कोटा किती कालावधीसाठी असेल किंवा त्याचे स्वरूप काय असेल याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. गेल्या महिन्यापासून साखर उद्योगातील विविध संस्था निर्यात कोटा वाढवून द्यावा यासाठी सातत्याने मागणी करत आहेत. याचा विचार करून १२ लाख टनांपर्यंत निर्यात कोट्यास परवानगी देण्याबाबत केंद्राने सकारात्मक विचार केल्याची माहिती केंद्रीय सूत्रांनी दिली.

सध्या जागतिक बाजारात साखरेचे दर कमी होत आहेत. घसरत चाललेल्या कच्च्या साखरेचे दरामुळे भारतीय साखर कारखानदार ३१००० रुपये प्रतिटन एक्स मिल यापेक्षा कमी दराने कच्ची साखर निर्यात करार करण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील वर्षी जास्तीतजास्त साखर निर्यात होण्यासाठी केंद्राने लवचिक धोरण अवलंबण्याची गरज आहे.
अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT